ETV Bharat / state

युवक क्रांती दलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर आंदोलन - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ न्यूज

विद्यापीठ प्रशासनाने एका विषयात शून्य गुण किंवा गैरहजर असलेल्या काही विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे दोन किंवा तीन विषयात गैरहजर आणि शून्य गुण देण्यात आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यापीठ प्रशासनाकडून सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ न्यूज
author img

By

Published : Dec 23, 2020, 4:27 PM IST

Updated : Dec 23, 2020, 4:38 PM IST

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निकालाबाबत अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही विद्यापीठ प्रशासन रीतसर जबाबदारी झटकत आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यात अडचणी येत आहे. त्याविरोधात आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर युवक क्रांती दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

युवक क्रांती दलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर आंदोलन
प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार विद्यापीठ प्रशासनाने एका विषयात शून्य गुण किंवा गैरहजर असलेल्या काही विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे दोन किंवा तीन विषयात गैरहजर आणि शून्य गुण देण्यात आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यापीठ प्रशासनाकडून सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून जोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा - पुण्याच्या चार वर्षीय रुद्राणीने भैरवगड केला सर; हिरकणी म्हणून मिळाली नवी ओळख

विद्यापीठ चूक मान्य करत नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑनलाईन जी परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेच्या निकालात झालेला घोळ अजूनही थांबत नाहीये. अनेक विद्यार्थ्यांना सर्व विषयात शून्य गुण देण्यात आले आहेत. तर, काहींना गैरहजर दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार करून ही काहीही मार्ग निघत नाहीये. विद्यापीठ प्रशासन तांत्रिक चूक झाली हे मान्य करतच नाहीये. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत, अशी माहिती युवक क्रांती दलाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडोळे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - पुण्यात पुन्हा एल्गार परिषद.. 31 डिसेंबरला परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज

Last Updated : Dec 23, 2020, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.