ETV Bharat / state

Yuva Sangharsh Yatra Postponed : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी 'युवा संघर्ष यात्रा' तूर्तास स्थगित - Yuva Sangharsh Yatra postponed

Yuva Sangharsh Yatra Postponed : युवांच्या विविध प्रश्नांसाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली 'युवा संघर्ष यात्रा' काही काळासाठी स्थगित केली आहे. शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केलाय.

Yuva Sangharsh Yatra Postponed
Yuva Sangharsh Yatra Postponed
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 8:44 PM IST

Updated : Oct 27, 2023, 10:58 PM IST

पुणे Yuva Sangharsh Yatra Postponed : आमदार रोहित पवार यांनी राज्यातील तरुणांच्या प्रश्नांसाठी 'युवा संघर्ष यात्रा' सुरू केली होती. मात्र, काही काळासाठी संघर्ष यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. शुक्रवारी संध्याकाळी आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, जयदेव गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.

विशेष अधिवेशन बोलवा : रोहित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सर्वजण प्रयत्नशील असून, त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यामुळं ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तसंच हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या : जरांगे पाटलांच्या आंदोलनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळं त्यांची परिस्थिती, राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि तरुणांची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. तसंच राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचं पवार यांनी म्हटलंय.

गावबंदीमुळं यात्रा रद्द नाही : मनोज जरांगे आमरण उपोषणावर बसल्यानंतर प्रत्येक गावात कोणत्याही नेत्याला प्रवेश करण्यास गावकऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र, या गावबंदीमुळं संघर्ष यात्रा थांबली नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. आम्ही संवेदनशील आहोत. आमची मुलं आत्महत्या करतात. त्यामुळं आम्ही ही यात्रा पुढं चालू ठेवू शकत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

...म्हणुन संघर्ष यात्रा स्थगित : राज्यातील तरुण वर्ग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. आजच्या यात्रेचा सकाळचा प्रवास जिथे संपला, तिथेच आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथील कार्यकर्ते आले आहेत. त्यांच्याशी आमची सतत चर्चा होत आहे. त्यामुळं सघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.

तरुणांना खोटी आश्वासनं : आम्ही तरुणांच्या प्रश्नासाठी लढत आहोत. मात्र, सर्वत्र राजकारण सुरू आहे. त्यामुळं मराठा समाजातील तरुण राजकारणामुळं अधिक त्रस्त झाला आहे. खोटी आश्वासनं दिली जातात, या विषयावर कोणी बोलत नाही. अनेक प्रकरणांमध्ये चौकशी समिती स्थापन केली जाते. मात्र, या समित्यांचे काही होत नाही. याबाबत मी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, त्याकडंही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावेळी लाखोंच्या उपस्थितीत जरांगे पाटलांची सभा झाली, तेव्हा इंटरनेट बंद करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता तरुणांना कुठेही संधी मिळत नाही. त्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. आता आरक्षणाच्या आधारे समाजात राजकारण केलं जात आहे. धनगर, मराठा समाजाच्या बाबतीत राजकारण सुरू आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

हेही वाचा -

Rohit Pawar : रोहित पवार यांनी शंभू महादेवाला घातलं साकडं, तर शंभर मुलांनी काढलं रोहित पवारांचे चित्र, पाहा व्हिडिओ

Rohit Pawar : युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; आमदार रोहित पवार यांच्या आई आणि पत्नी झाल्या भावूक...

Yuva Sangarsh yatra : युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून सुरवात; रोहित पवारांच्या साथीनं खासदारांसह माजी मंत्रीही यात्रेत सहभागी

Last Updated : Oct 27, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.