दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील राहू येथे मंगळवार (दि. 1) रोजी येथील मुळा-मुठा नदीपात्रामध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेला तरुण मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत केला असून अद्याप त्याचा शोध लागला नाही.आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने त्याचा शोध घेण्याचे कार्य वेगात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहू येथील मुळा-मुठा नदी पात्रामध्ये मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुर्वेश जालिंदर पंडित (वय १७) हा तरुण आपल्या मित्रांसमवेत गणपती विसर्जनासाठी गेला होता. सध्या नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली असून पाण्याचा प्रवाह देखील अधिक असल्याने गणपती विसर्जन करताना दुर्वेश याचा तोल जाऊन तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री 11 पर्यंत नागरिकांनी होडीच्या साह्याने त्याचा नदीपात्रात शोध घेतला, मात्र हाती काहीच न लागल्याने मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला पाचारण करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता त्यांची एक टीम राहू येथे दाखल झाली असून त्यांच्याकडूनही शोध कार्य सुरू आहे.
गणपती विसर्जनासाठी गेलेला तरुण नदीत बुडाला, अजूनही शोध सुरूच - दौंड तरुण नदीत बुडाला
राहू येथील मुळा-मुठा नदी पात्रामध्ये मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुर्वेश जालिंदर पंडित (वय १७) हा तरुण आपल्या मित्रांसमवेत गणपती विसर्जनासाठी गेला होता. सध्या नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली असून पाण्याचा प्रवाह देखील अधिक असल्याने गणपती विसर्जन करताना दुर्वेश याचा तोल जाऊन तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला.
![गणपती विसर्जनासाठी गेलेला तरुण नदीत बुडाला, अजूनही शोध सुरूच दुर्वेश जालिंदर पंडित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8655269-712-8655269-1599055288514.jpg?imwidth=3840)