ETV Bharat / state

एसटीखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; बारामतीमधील घटना

author img

By

Published : Dec 27, 2020, 1:43 AM IST

सदर युवक हा आपले वडील सावळा भास्कर काळे यांच्यासमवेत फळे खरेदी करीत असताना अचानक मागे वळला व त्याचा तोल गेला. याच दरम्यान बारामतीकडून निरेकडे निघालेल्या (एम. एच. 20 डी. 8047) या क्रमांकाच्या एसटीच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. सदर घटनेप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

youth died in an accident with ST bus in Baramati
एसटीखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; बारामतीमधील घटना

बारामती - शहरातील इंदापूर चौकात तोल जाऊन एसटी खाली पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. आज सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. अनिल सावळा काळे (वय 25, रा.अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे एसटी खाली सापडून मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

फळे खरेदी करीत असताना गेला तोल..

सदर युवक हा आपले वडील सावळा भास्कर काळे यांच्यासमवेत फळे खरेदी करीत असताना अचानक मागे वळला व त्याचा तोल गेला. याच दरम्यान बारामतीकडून निरेकडे निघालेल्या (एम. एच. 20 डी. 8047) या क्रमांकाच्या एसटीच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. सदर घटनेप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

सूचनांचे पालन न केल्यामुळे झाला अपघात..

बारामती बस स्थानकातून सुटणारी प्रत्येक एसटी शहरातून न नेता त्या रिंगरोडने न्यावी, अशी सूचना बारामती बस आगाराकडून चालकांना वारंवार दिली जात आहे. मात्र, तरीही काही बस चालक या सूचनांना न जुमानता थेट शहरातील गर्दीच्या रस्त्यावरूनच बस दामटत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच अशा प्रकारचे अपघात घडत आहेत.

हेही वाचा : पाटस-दौंड राज्यमार्गावर गॅस वाहतूक करणारा ट्रक पलटी; मोठी दुर्घटना टळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.