बारामती (पुणे) - शहरातील एका शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गतवर्षी झालेल्या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दिनेश सहदेव पोटे (वय.२८, रा.जुना मोरगाव रस्ता, बारामती) याला अटक केली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात १ मे २०१९ रोजी एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने बारामतीत खळबळ माजली होती. या प्रकरणात पोलिसांवर तपासाची मोठी जबाबदारी होती. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी बारामतीत कार्यभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. या तपासामध्ये अनेक बाबी समोर आल्या असून या प्रकरणात पोलिसांनी गोपनीय तपास करून माहिती काढल्यानंतर हा प्रकार दिनेश पोटे याने केल्याचे निष्पन्न झाले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला दीड वर्षानंतर अटक - बारामती बलात्कार बातमी
गेल्यावर्षी मे महिन्यात एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. तब्बल दीड वर्षीनंतर या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.