पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये डॉक्टर तरुणीला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण आकडेवारी ५९वर पोहचली आहे. पैकी १५ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आकडेवारी वाढत असून ही बाब चिंताजनक आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असून, यात एकाचा मृत्यूदेखील झाला आहे. दरम्यान, आज पिंपरी-चिंचवड शहरात राहत असलेल्या डॉक्टर तरुणीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ती पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टर म्हणून, कार्यरत असून तिला पुण्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसात दहा रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर न निघता कोरोनाविरुद्ध लढता येईल. परंतु, अनेकदा नागरिक हे बाहेर विनाकारण फिरताना दिसत आहेत. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये डॉक्टर तरुणीला कोरोनाची लागण - pune
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असून, यात एकाचा मृत्यूदेखील झाला आहे. दरम्यान, आज पिंपरी-चिंचवड शहरात राहत असलेल्या डॉक्टर तरुणीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.