ETV Bharat / state

Yerwada Jail: येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू; स्मार्ट कार्डद्वारे कैदी साधणार घरच्यांशी संवाद - अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता

आजपासून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैदी हे स्मार्ट फोनच्या माध्यमातून घरच्यांशी संवाद साधणार आहेत. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकरीता प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध झाली आहे.

Yerwada Jail
येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधा
author img

By

Published : Jun 23, 2023, 7:18 PM IST

माहिती देताना अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता

पुणे : आजपर्यंत आपण येरवडा कारागृहात एखादा कैदी जेलमध्ये असला की, त्याचे नातेवाईक हे कॉइन बॉक्सच्या माध्यमातून बोलताना आपण पाहिले आहे. पण राज्यात प्रथमच येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरीता प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध झाली आहे. याचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. आता कैदी देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या घरच्यांशी संवाद साधणार आहे.

का केली सुविधा सुरू : सद्यस्थितीत बंद्यांकरीता नातेवाइकांशी संपर्क करण्याकरीता कॉइन बॉक्स सुविधा आहे. परंतु हे कॉइन बॉक्स सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध नाहीत. तसेच हे कॉईन बॉक्स नादुरूस्त झाल्यास सहजासहजी दुरूस्त करून मिळत नाही. यामुळे बहुतांशी ही सुविधा बंद झाली होती. तसेच ज्या बंद्यांना अतिसुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमधील बंद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स ज्या ठिकाणी बसविण्यात आला आहे, त्या ठिकाणी न्यावे लागत असल्याने, ही कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. या बाबींचा विचार करून राज्यातील काही कारागृह अधिक्षकांनी कॉईन बॉक्स ऐवजी साधे मोबाइल फोन वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती अपर पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. तसेच यावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास केली होती. या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने देखील मान्यता दिली आहे. त्यानुसार आज पासून ही सुविधा सुरू करण्यात आली.

इतका वेळ कैद्यांना घरच्यांशी बोलता येणार : या स्मार्ट कार्डचे काम ॲलन ग्रुप, एल ६९ मणिकंपलयन हाऊसिंग युनिट, इरोड, तमिळनाडू यांच्या मार्फत पुरविण्यात आले आहे. ही स्मार्ट कार्ड सुविधा कारागृहातील बंद्यांना पात्रतेनुसार महिन्यातून 3 वेळा 10 मिनिटांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामुळे बंद्यांना स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधणे अधिक सोईस्कर झाले आहे. बंद्यांचा नातेवाईकांशी तसेच वकिलांशी सुसंवाद झाल्याने कारागृहातील बंद्यांचा मानसिक ताण-तणाव कमी होऊन, कारागृह सुरक्षेचा प्रश्न काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे बंद्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होईल. तसेच येरवडा कारागृहातील या सुविधेचा आढावा घेऊन राज्यातील इतर कारागृहामध्ये देखील याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भविष्यामध्ये स्मार्ट कार्ड फोन सुविधामध्ये आणखी सुधारणा करून पात्रतेसंदर्भात शिथीलता आणण्याचा देखील विचार करण्यात येणार आहे.

भविष्यात व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध होणार : या स्मार्ट कार्ड फोन सुविधेमध्ये कैद्यांना महिन्यातून 30 मिनिटे 3 नंबरवर दहा - दहा मिनिटे बोलता येणार आहे. याची सर्व माहिती ही कारागृह प्रशासनाकडे असणार आहे. तसेच याची रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे. जेणे करून संबंधित कैदी हा घरच्यांशीच बोलत आहे की, त्याच्या टोळीतील लोकांशी बोलत आहे. याची देखील खबरदारी घेण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात आतमध्ये मोबाईल घेऊन गेल्याच्या घटना घडल्या होत्या. अशा घटना घडू नये, यासाठी देखील खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच आता स्मार्ट कार्ड फोनद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. भविष्यात कैद्यांना व्हिडिओ कॉलची देखील सुविधा देण्यात येणार असल्याचे यावेळी गुप्ता यांनी सांगितले.

कारागृहात 40 स्मार्ट फोन बसविण्यात आले : या स्मार्ट कार्ड फोन सुविधेमध्ये येरवडा कारागृहात 40 स्मार्ट फोन बसविण्यात आले आहे. यात एक नंबर सर्कल मध्ये 8 फोन, 2 नंबर सर्कल मध्ये 6 फोन, 3 नंबर सर्कल मध्ये 6 फोन, टिळक नवीन बॅरेक मध्ये 3, टिळक विभागात 2, किशोर विभागात 3, हॉस्पिटल विभागात 2, हॉस्पिटल विभाग 8 मध्ये 1, सि.जे विभागात 2, नवीन बॅरेकमध्ये 2, बी यार्डमध्ये 2, सुरक्षा एक आणि दोन मध्ये 1, सुरक्षा 3 मध्ये 1, तसेच हॉस्पिटल सेप्रेटमध्ये 1 असे एकूण 40 स्मार्ट कार्ड फोन ठेवण्यात आले आहे.

कारागृहातील बंदी संख्या : सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात सद्यस्थितीला 6785 बंदी असून यात पुरुष बंदी हे 6517 आहे तर महिला बंदी हे 268 आहे. या सर्वांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या 6785 बंदीमध्ये न्यायाधीन बंदी हे 3842 आहे. तर कलम 302 मधील बंदी हे 1560 आहे. जन्मठेप बंदी 582 आहे. मृत्युदंड बंदी हे 1612 आहे. लालपट्टी बंदी 82 आहे. स्थानबद्ध बंदी हे 51 आहे. रात्रपहारेकरी बंदी 66, सिध्दद्वेष अनवेक्षक 05 बंदी आहे.

हेही वाचा -

  1. Inmates clashed in Yerawada Jail: येरवडा कारागृहात 16 कैद्यांची आपापसात हाणामारी; दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण
  2. Honey Trap Case : ज्या कारागृहात उद्घाटन केले, त्याच कारागृहात कैदी झाले प्रदीप कुरुलकर
  3. Pune Yerawada Jail: कैद्यांनी बनवलेल्या वस्तूच्या उत्पादनात पुण्यातील येरवडा कारागृह अग्रस्थानी; वर्षभरात 2.99 कोटींची कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.