ETV Bharat / state

Nagnath Kottapalle Passed Away: जेष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन - नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

Nagnath Kottapalle Passed Away: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन ( Nagnath Kottapalle Passed Away ) झाले आहे. तब्बेत खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाले आहे.

Nagnath Kottapalle Passed Away
जेष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
author img

By

Published : Nov 30, 2022, 3:43 PM IST

Updated : Nov 30, 2022, 4:08 PM IST

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. एक वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर या आजाराचे निदान झाले होते. १५ दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना पुण्यातील खासगी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शिल्पा कोत्तापल्ले (सून) यांनी दिली होती. आज दुपारी त्यांचे निधन झाले आहे.

मराठी विषयात पहिले - नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला.शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले. त्यांनी १९८० मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथुन डॉ.यु.म.पठाण सरांच्या मार्गदर्शनाने 'शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर पीएच. डी.चे संशोधन करुन त्यांनी पदवी मिळवली होती.

कारकीर्द - नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.

कुलगुरूपदी निवड - ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.

विविध संमेलनाचे अध्यक्ष - मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन, कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (२००३) राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते

नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार -

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ
मूड्स (१९७६)
संदर्भ (१९८४)
गांधारीचे डोळे (१९८५)

ग्रामीण साहित्य (१९८५)
उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
'ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध'साठी परिमल पुरस्कार (१९८५)
'ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)

दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
'राख आणि पाऊस'साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
'राख आणि पाऊस'साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
'साहित्य अवकाश'साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार

Last Updated : Nov 30, 2022, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.