पुणे - दीड लाख तांदळाच्या दाण्यांवर राम नाम लिहिण्याचे अनोखे काम नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केले आहे. दुर्बिणीशिवाय वेगवेगळ्या रंगांमध्ये लिहिण्याची कला अवगत केल्याने नवीन विक्रमाची नोंद झाली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आकाश बाजडने असे या विद्यार्थ्याचे नाव असून गिनीज बुकात या विक्रमाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - राजगुरुनगर बसस्थानकात युवकाला गावठी पिस्तूलासह अटक
आकाशला त्याच्या वडिलांनी मार्गदर्शन केले असून त्यांनी दुर्बिणीशिवाय तांदळाच्या दाण्यावर कसे लिहायचे ते शिकवले. दोन ते अडीच महिन्यांचे अथक परिश्रम घेतल्यावर आकाशने तब्बल दीड लाख तांदळाच्या दाण्यांवर राम लिहित नवीन विक्रम केला. या कामगिरीने आकाशचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले असून गिनीज बुकात नोंद झाली आहे.
या विक्रमानंतर आता 'वंदे मातरम' किंवा 'राष्ट्रगीत' तांदळावर लिहिण्याचा त्याचा मानस आहे. आकाश रोज शाळेत जातो आणि शाळेचा अभ्यास संपल्यानंतर बारा रंगांमध्ये राम हे नाव तांदळाच्या दाण्यावर लिहितो. आकाशने त्याच्या नावाप्रमाणे मोठे नाव केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - अशोक चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेना मंत्र्याची प्रतिक्रिया, म्हणाले...