पुणे - जत्रा यात्रा म्हटल की, गाव खेड्यांसह शहरी भागात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत असतो, मात्र सध्या यात्रा उत्सवांचे कुस्तीची दंगल मुख्य आकर्षण बनत चालले आहे. क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मगावात राजगुरुवाड्याच्या समोरच असणाऱया कुस्ती आखाड्यात कुस्तीची दंगल पार पडली. यामध्ये तरुण-तरुणींच्या कुस्ती पहायला मिळाले.
बैलगाड्यांच्या शर्यत बंदीनंतर गाव-खेड्यांसह शहरी भागातील जत्रा-यात्रांचा आनंद हरवत चालला होता, मात्र पुर्वीचा मैदानी असलेला कुस्ती आखाडाही बंद पडण्याच्या मार्गावर होता त्याचवेळेत अभिनेता अमीर खानच्या दंगल चित्रपटाने पुन्हा या मैदानी खेळाला नवा रंग दिला आणि कुस्तीच्या दंगलीला सुरुवात झाली. यावेळी २० ते २५ तरुण मुलींनी तर १५० पेक्षा जास्त कुस्ती मल्लांनी सहभाग घेतला.
जुने खेड व सध्याचे राजगुरुनगर या क्रांतिकारकाच्या गावात कालपासुन यात्रा उत्सव सुरु आहे. आजच्या दुसऱ़या दिवशी लाल मातीच्या मैदानी खेळाच्या कुस्तीच्या आखाड्यात आता तरुणांसह तरुणी मुलीही आखाड्यात उतरायला लागल्या आहेत. आता या तरुणी अगदी निकाली कुस्तीचे मानकरी ठरु लागल्याने कुस्ती शौकिनांनाही या कुस्ती पहायला गर्दी करत आहेत.