पुणे - किरकोळ वादातून पैलवानांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पीडित तरुणाचे नाकाचे हाड तुटले असून डोक्याला सहा टाके पडले आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. शिरीष राऊत असे जखमी तरुणाचे नाव आहे. तरुणाने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाच पैलवानांना अटक केली आहे. या घटनेनंतर ओंकार खाटपे, विनायक वाल्हेकर, सुमित मरगजे, शुभम गव्हाणे आणि अभिषेक खाटपे अशी अटक केलाल्या पैलवानांची नावे आहेत.
रस्त्यावरून जाताना गाडी आडवी आल्याच्या कारणावरून पीडित तरुण आणि पैलवानांमध्ये वाद झाला. या वादानंतर पैलवानांनी बेदम मारहाण केल्यामुळे तरुणाच्या नाकाचे हाड तुटले आणि त्याच्या डोक्याला सहा टाके पडले. या मारहाणीत आणखी दोन तरुण आणि एक महिलाही जखमी झाली आहे. हे सर्व पैलवान मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील असल्याची माहिती मिळाली आहे. शिरीष राऊत या तरुणाने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाच पैलवानांना अटक केली. ही घटना 23 ऑगस्टला रात्री धनकवडी परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली. या घटनेमुळे पुण्यातील धनकवडी परिसरात काही काळासाठी भीतीचे वातावरण झाले होते. ओंकार खाटपे, विनायक वाल्हेकर, सुमित मरगजे, शुभम गव्हाणे आणि अभिषेक खाटपे अशी अटक करण्यात आलेल्या पैलवानांची नावे आहेत.
फक्त गाडीला गाडी आडवी आल्याचे निमित्त झाले आणि रागाचा पारा चढलेल्या पैलवानांनी दोघांना अक्षरशः बेदम मारहाण केली. हे पैलवान इतक्यावरच थांबले नाही. तर, त्यानंतर या पैलवानांची फोन करून त्यांच्या आणखी काही साथीदारांना बोलावून घेवून भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांचीही धुलाई केली. या मारहाणीत शिरीष राऊत या तरुणाच्या नाकाचे हाड तुटले आणि डोक्याला सहा टाके पडले . बेशुद्ध पडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात भरती केले आहे.