ETV Bharat / state

World Health Day 2023: जागतिक आरोग्य दिन; कोणकोणत्या वयोगटात होतात कोणते आजार, काय घ्यावी काळजी - Health Information on world health day

दरवर्षी, जगभरातील लोकांच्या आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटले जाते. तर कोण कोणत्या आजारावर कशी काळजी घ्यायाची हे जाणून घ्या.

World Health Day 2023
जागतिक आरोग्य दिन
author img

By

Published : Apr 7, 2023, 9:52 AM IST

Updated : Apr 7, 2023, 11:12 AM IST

जागतिक आरोग्य दिन; कोणकोणत्या वयोगटात होतात कोणते आजार

पुणे : जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी सात एप्रिल रोजी आपल्या स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करते. देशासह जगात दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे आपल्या सर्वांना आरोग्याचे महत्त्व कळाले आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त सध्या वाढत असलेल्या विविध आजार, बदलती जीवनशैली यामुळे कोणकोणत्या वयोगटातील लोकांना सध्या कोण कोणते आजार होत आहे. तसेच याबाबत त्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी विशेष असे मार्गदर्शन केले आहे.

आजार झाल्यास सरकारी रुग्णालयात जावे: आज जागतिक आरोग्य दिवस असून जगभरात सध्या गेल्या काही वर्षांपासून विविध आजार येत आहे. तर दुसरीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे देखील विविध आजारांमध्ये वाढ होत आहे. आपले आरोग्य हे निरोगी राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जर चुकून कोणतेही आजार झाल्यास सरकारी रुग्णालयात उपचार केले पाहिजे. आजारांमध्ये दोन प्रकारचे आजार असतात एक म्हणजे संसर्गजन्य आजार आणि दुसरे म्हणजे असंसर्गजन्य आजार. गेल्या काही महिन्यांपासून निझेल तसेच कोविडमध्ये वाढ झाली आहे. याच्यासाठी लसीकरण हे देखील मुख्य उपचार असून यावर नियंत्रणासाठी लसीकरण हे मोठ्या प्रमाणात केले पाहिजे.

या आजारांनमध्ये होत आहे वाढ: राज्यात पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी पुन्हा कोरोना वाढू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी मास्क तसेच त्रिसुत्री जी उपाययोजनेसाठी प्रयत्न केले पाहिजे. विशेष म्हणजे लसीकरणावर भर दिला पाहिजे. लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावे असे आवाहन देखील यावेळी डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे. मिझेल तसेच स्वाईन फ्ल्यू हे आजार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच 30 ते 45 वयोगटातील जे लोक आहे, त्यांच्यात जर संसर्गजन्य आजाराचे म्हटले तर, यात कोविड तसेच एच3एन3 हे खूप सामान्य आहेत. तर दुसरीकडे असंसर्गजन्य आजार बाबत सांगायचे म्हटले तर यात ओबीसीटी, ब्लडप्रेशर वाढ, डायबेटिस, तसेच सांद्याची झीज, इनफ्लेबीटी आजार, थ्यारॉड, कॅन्सर अशा आजारांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे.

आजरांबद्दल रुग्णांना माहिती देणे: शासनाकडून 6 ते 7 आजार निवडण्यात आले. याचे कॅलेंडर मार्क करण्यात आले आहे. यात ओबीसीटी, डायबेटिस, ब्रेस्ट कॅन्सर, बोनडेनसिटी अशा या आजारावर शासनाकडून एक क्लिनिक घेतल जाते. यात या आजरांबद्दल रुग्णांना माहिती तसेच त्यांची तपासणी केली जाते. हे आजार लवकरच कळल्यावर त्यावर योग्य ते उपाययोजना करण्यात येते, असे देखील यावेळी ठाकूर म्हणाले.

हेही वाचा: Good Friday 2023 असा आहे गुड फ्रायडेचा इतिहास ख्रिश्चन धर्मात महत्वाचा दिवस

Last Updated : Apr 7, 2023, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.