ETV Bharat / state

World Bicycle Day 2023 : ‘पुणे तिथे काय उणे’! सायकल चालविण्याबरोबर धुवा कपडे, एकाच कामात दोन फायदे देणारे मशीन विकसित

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी सायकलीचे शहर म्हणून पुणे प्रसिद्ध होते. पुण्यातील मंदार पाटील यांनी स्वतःची नोकरी सांभाळून मिळालेल्या वेळेत एक स्पेशल सायकल तयार केली आहे. सायकल वॉशिंग मशिन असे या सायकलचे नाव आहे. या वॉशिंग मशीनमुळे पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच सायकललिंग देखील करता येणार आहे.

cycle washing Machine
सायकल वॉशिंग मशिन
author img

By

Published : Jun 3, 2023, 3:52 PM IST

माहिती देताना मंदार पाटील

पुणे: आज जागतिक सायकल दिन आहे. बालवयातच मुलांना दुचाकी मिळत असल्याने सायकलिंगचा आनंद दुरावला जात आहे. अनेक युवकही हौस म्हणून सायकल घेतात. मात्र, कालांतराने त्याही धूळ खात पडतात. मात्र, असे न करता व्यायाम व करिअरसाठी सायकलिंग करणे उत्तम आहे. यांचा विचार करून पुण्यातील एका तरूणाने चक्क सायकल वॉशिंग मशिन तयार केली आहे. यांचा फायदा हा आरोग्याबरोबर कपडे धुण्यासाठी होते.

सायकल सोडून दुचाकीला पसंती: ज्यावेळी कुठलेही नवीन शोध लागले नव्हते त्यावेळेस पुण्यात प्रत्येक व्यक्तीकडे सायकल होती. त्यामुळे सर्वाधिक सायकलीचे शहर म्हणून पुण्याला ओळखले जात होते. कालांतराने दुचाकीचे शहर म्हणून पुण्याला नवीन ओळख मिळाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पुणेकरांनी पायडल मारणारी सायकल सोडून दुचाकीला पसंती दिली. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे आज जागतिक सायकल दिन आहे. ज्याप्रमाणे जग बदलत गेले तसे सायकलीचे सुद्धा पॅटर्नही बदलत गेले.

हे आहेत वॉशिंग मशीन फायदे: पुण्यामध्ये सायकल छंद असणाऱ्या प्रोफेसर मंदार पाटील यांनीही सायकल तयार केली आहे. यामध्ये सात किलो कपडे एका वेळेस धुता येणार आहेत. यामध्ये लाईटची बचत होणार आहे. तसेच सायकलिंग केल्यामुळे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर या वॉशिंग मशीनमुळे पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. एक प्रकारे पर्यावरण पूरक आणि मानवाच्या आरोग्यासाठी हितकारक अशी ही वॉशिंग मशीन आहे.

आज जागतिक सायकल दिन, सायकलिंग केल्यामुळे आरोग्य सुधारते. पाण्याची, वेळेची, विजेची बचत करणारी सायकल वॉशिंग मशिन आहे.ही वॉशिंग मशीन वस्तीगृहात राहणाऱ्या, कॉलेजात राहणाऱ्या, नोकरी व्यवसायासाठी बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी ही मशीन उपयोगात येणार आहे. - मंदार पाटील

सायकलवरून कपडे धुवता येणार: मंदार पाटील यांनी याअगोदर सुद्धा फोल्डिंगची सायकल तयार केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सायकली तयार करणे हा त्यांचा छंद आहे. स्वतःची नोकरी सांभाळून मिळालेल्या वेळेत ते हे सगळं छंद जोपासतात. यात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातूनच आता ही नवीन सायकल तयार केली. ज्या सायकलवरून आता कपडे धुवून मिळणार आहेत. अशी वाशिंग मशीन अटॅच करण्यात आली आहे. ही वॉशिंग मशीन वस्तीगृहात राहणाऱ्या, कॉलेजात राहणाऱ्या, नोकरी व्यवसायासाठी बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी ही मशीन उपयोगी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी होणार उपयोग: मंदार पाटील हे गेल्यास नऊ महिन्यापासून या सगळ्या कामासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांना अवसारी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे एचओडी डॉक्टर शेखर गजल हे मार्गदर्शन करत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या मेहनतीने त्यांनी ही सायकल तयार केली आहे. लवकरच या सायकलचा वेगवेगळ्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उपयोगात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सायकल उपयोगात येणार आहे. या सायकलमुळे आपल्याला वेगळे सायकललिंग करण्यासाठी वेळ द्यायची गरज नाही. कपडे धुवायला सुद्धा वेळ द्यायची गरज नाही. अगदी एन्जॉय करत आपल्याला हे कपडे धुता येणार आहे.

तंत्रज्ञानाचा वेग झपाट्याने वाढत आहे: वाढते आधुनिकीकरण, जागतिकीकरण, याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कालांतराने सायकल सुद्धा मागे पडते का? काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सायकलने सुद्धा चार्जिंगवर, लाईटवर, त्यानंतर घेरवर सायकल आली. आधुनिक ते बरोबर सायकल सुद्धा बदलत गेली. आता आपल्या दैनंदिन कामाच्या उपयोगाला सायकल आणण्याचे सुद्धा काम या संशोधनाने तयार झालेला आहे. तसचे सायकल आणि व्यक्ती याचे एक भावनिक नात असते. आज जे व्यक्ती 60 वयामध्ये आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीने शाळेपासून कॉलेज पासून कधीतरी सायकल वापरली आहे. त्यामुळे ती सायकल एक भावनाचे बंध जोडणारी असते. ती सायकल शरीराचे सुदृढडीकरण करण्यासाठी सुद्धा मदत करते.

हेही वाचा -

  1. World Bicycle Day जागतिक सायकल दिनानिमित्त स्मार्ट सिटीतर्फे सायकल रॅली अनेकांनी घेतला सहभाग पाहा व्हिडिओ
  2. World Bicycle Day 2023 जागतिक सायकल दिन 2023 सायकल चालवणे आरोग्य आणि पर्यावरणासाठी आहे फायदेशीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.