पुणे : महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये राज्यातील महिलांना एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्याची अंमलबजावणी विषयी टीका होत होती. या संदर्भात राज्य सरकारने काल जीआर काढून ही सवलत आज पासून महाराष्ट्राच्या सर्वच एसटी डेपो बस स्थानकामध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
महिलांना 50% तिकीट दरात सुट : त्यामुळे आज पासून महाराष्ट्रात कुठेही महिलांना फिरण्यासाठी 50% तिकीट दराने त्यांना प्रवास करता येणार आहे. या निर्णयाचे महिला वर्गातून स्वागत होत असून विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार महिलांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. महिलांसाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो तसेच सरकारचेही अभिनंदन करतो अशा प्रतिक्रिया आता महिला वर्गातून व्यक्त होत आहेत.
आजपासून अंमलबजावणी : पुण्यातील स्वारगेट बसल्याचे व्यवस्थापनानेसुद्धा हा जीआर रात्री प्राप्त झाला असून त्यानुसार आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे. निर्णयामुळे राज्य सरकारचा महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होताना दिसत आहे. भूषण सूर्यवंशी यावेळी म्हणाले की, सर्व महिलांनी या सवलतीचा फायदा घेऊन एसटीमधून जास्तीत जास्त प्रवास करावा असे अवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून आनंद : शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा याचा आनंद साजरा करताना पुण्यातील स्वारगेट बस डेपो मध्ये महिलांना पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले आहे. जे मागच्या सरकारला जमले नाही, ते आम्हाला जमले अशा प्रतिक्रिया सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून व्यक्त केल्या आहेत.
राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासातील तिकीट दरात 50 टक्के सवलत जाहीर अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली होती. उपमुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतांना ही घोषणा केली होती. महिलांना आजपासून एसटी महामंडळाच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळाल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा - Notice To All Strikers : मुंबई उच्च न्यायालय सर्व संपकरांना नोटीस बजावणार