पुणे - पुण्याच्या आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत ( Hinjewadi ) मुळा नदीलगत ( Mula River ) झाडावर अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरावा नष्ट करण्याचा हेतून तो झाडाच्या फांदीवर लटकवण्यात ( Dead Body Find Out on Tree ) आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवार (दि. 31 मार्च) सकाळी हा मृतदेह झाडावून खाली काढण्यात आला आहे.
हिंजवडीच्या मान परिसरात असणाऱ्या मुळा नदीलगत झाडाच्या फांदीवर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ( Hinjewadi Police ) घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाचा गाऊन असून तो महिलेचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. नदीच्या बाजूला घनदाट झाडी आहे. त्यामुळे तिचा खून कोणी आणि का, केला हे अस्पष्ट आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. त्यानंतर हिंजवडी पोलीस यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. दरम्यान, महिलेचा मृतदेह असल्याने दोन पोलीस कर्मचारी रात्रभर मृतदेहाचा पहारा करत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली आहे.
हेही वाचा - Special Sword Pune : आधुनिक युगात ऐतिहासिक तलवार साकारणारा पुण्यातील सत्यजित वैद्य