ETV Bharat / state

पुण्यात महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी...हल्लेखोर फरार

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे शौचास गेलल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यावेळी विरोध केल्याने आरोपीने महिलेचे दोन्ही डोळे निकामी केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित महिला ससून रुग्णालयात उपचार घेत असून प्रकृती गंभीर आहे.

physical abuse in pune
पुण्यात महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी...हल्लेखोर फरार
author img

By

Published : Nov 4, 2020, 8:54 PM IST

पुणे - शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे शौचास गेलल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तसेच पीडितेवर प्राणघातक हल्ला केल्याचे देखील उघडकीस आले आहे. या प्रकारादरम्यान विरोध करताना महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित महिला गंभीर जखमी असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात हल्लेखोरांविरोधात शिरूर पोलिसांनी विनयभंग करून जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी...हल्लेखोर फरार
प्राणघातक हल्ला झालेली पीडित महिला 37 वर्षांची असून पतीसोबत न्हावरे गावात पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होती. काल रात्री नऊच्या सुमारास घराच्या आजूबाजूलाच शौचालयास गेल्यानंतर बाजूच्या झुडूपात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेची छेड काढली. यावेळी महिलेने प्रतिहल्ला केल्यानंतर संतप्त व्यक्तीने महिलेवर हल्ला करत तिचे दोन्ही डोळे निकामी केले. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून शिरूर पोलीस त्याचा शोध घेत आहे.महिलेवर हल्ला करत डोळे केले निकामी

नराधमाने महिलेवर प्राणघातक हल्ला करत तिचे केस पकडून खाली पाडले. यानंतर त्याने धारदार हत्याराने एक डोळा बाहेर काढला, तर दुसरा जागीच निकामी केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिचा पती व शेजारील नागरिक मदतीसाठी धावत आले. यानंतर हल्लेखोर फरार झाला. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळाची पोलीस अधीक्षकांकडून पाहाणी

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिरूर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेवर झालेला जीवघेणा हल्ला का व कशासाठी केला याची तपासणी शिरूर पोलिसांकडून सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.