पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतून अखेर संभाजी ब्रिगेडने माघार घेतली आहे. शिवसेना महाविकास आघाडीत असल्यामुळे ही सगळी जबाबदारी शिवसेनेची होती. ती शिवसेनेने शिष्टाई योग्य प्रकारे केल्याने संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवारी माघारी घेतलेली आहे.
महाविकास आघाडीचा करणार प्रचार : कार्यकर्त्यांना चांगला मानसन्मान मिळावा यासाठीच ही उमेदवारी दाखल केली होती परंतु आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला आदेश आले. त्यामुळे आम्हीही माघार घेत आहोत. यापुढे आम्ही महाविकस आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करू असे यावेळी उमेदवार अविनाश मोहिते यांनी म्हटलेलं आहे.
उद्धव ठाकरे,अजित पवार यांच्यात चर्चा : राजकारणामध्ये विचार वादविवाद हे होत असतात परंतु शेवटी संभाजी ब्रिगेडचे मावळे हे आदेश मानणारे असतात. मावळ्याने आदेश मानायचा असतो. त्याप्रमाणे काल उद्धव ठाकरे,अजित पवार यांच्या मध्यस्थीने काही चर्चा झाली. त्या चर्चेने आमचे समाधान झाले असून संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच आम्ही माघार घेतली आहे. यापुढे काँग्रेसने आम्हाला सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
आम्ही सगळेजण एकच : अर्ज माघारीनंतर कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आम्ही सगळेजण एकच आहोत. परंतु काही गैरसमज झाले ते गैरसमज दूर झाले आहेत. महाविकास आघाडीसाठी आम्ही सर्वजण एकत्र काम कर. संभाजी ब्रिगेडने माघार घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्याकडून जेवढे काही कार्यकर्त्यांना मान देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न करीन. महाविकास आघाडी सरकारचा उमेदवार निवडून येईल असे सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेले आहे.
कसब्यात रविंद्र : याच कसब्याच्या प्रचारामध्ये केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र कसब्यात रवींद्र असे सोशल मीडिया वरती काही संदेश फिरत आहेत. त्यावर उमेदवार रवींद्र रवींद्र धंगेकरांची यांनी स्पष्टीकरण दिले असून, देशात राहूल गांधी राज्यात महाविकास आघाडी, आणि कसब्याची महाविकास आघाडी म्हणजे आम्ही सगळे असे म्हणत, हे कार्यकर्त्यांनी काही केले असेल. परंतु तसे काही नसल्याचे स्पष्टीकरण सुद्धा यावेळी त्यांनी दिले आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकरांची आता लढाई थोडी सोपी झालेली आहे. कारण संभाजी ब्रिगेडने यातून माघार घेतलेली आहे.