ETV Bharat / state

बारामतीत पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाडीने वार करून केले जखमी - wife stabbed husband in baramati

बारामतीत पत्नीने डोक्यात कुऱ्हाडीने वार करून पतीला जखमी केले. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

wife stabbed husband with an ax in baramati
बारामती पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 25, 2020, 10:42 AM IST

बारामती (पुणे) - वेगळे राहण्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी काजल लक्ष्मण कासवे (रा. मेडद, बारामती) या महिलेविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी १९ नोव्हेंबरला घडली. याबाबत सुनील उर्फ लक्ष्मण रामभाऊ कासवे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पत्नी काजल वेगळे राहण्यावरुन पतीला सातत्याने त्रास देत होती. शिवीगाळ करीत होती. जीवे मारण्याची धमकी ही देत होती. दरम्यान गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पती खोलीत झोपला असता पत्नी काजलने कुर्‍हाडीने पतीच्या हनुवटीवर घाव घातला. वेळीच जाग आल्याने पती लक्ष्मण याने कुर्‍हाड पकडली. तरीही छातीवर वार झाला. मुलाने उठत दाराची कडी काढली. त्यानंतर भाऊ, आई-वडिलांनी कुऱ्हाड हातातून हिसकावून घेत लक्ष्मणची सुटका केली. लक्ष्मण यांना बारामतीत खासगी रुग्णालयात दाखल केले असून पत्नी विरोधात पोलिसांनी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये १२ हजार रुपयासाठी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; दोघांना अटक

हेही वाचा - ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.