पुणे : ओशो भक्तांमध्ये माळेच्या महत्त्वाबद्दल विचारले असता याबाबत स्वामी चैतन्य कीर्ती यांनी सांगितले की, ओशो यांनी मनाली येथे नवसन्यास आंदोलन जेव्हा सुरू केले तेव्हा त्यांनी हे माळा असे नाव दिले. यात 108 मनके असून हे स्मरण करण्यासाठी आहे. तसेच ध्यानाची 108 विधी आहेत. त्याचबरोबर यात एक धागा आहे, जो याला सांभाळून ठेवतो. तो साक्षी भावच स्मरण देत असतो. यात 108 विधी काहीही असू शकतात. या माळेमध्ये ओशो यांचे चित्र आहे. भक्त ओशो यांच्या समोर संन्यास घेतात. विशेष म्हणजे या माळेचे एक वैशिष्ट्य असे आहे की माळ हे ओशो भक्त असल्याचे प्रतीक आहे.
नवं संन्यास अकादमी सुरू: आज काही लाखो लोकांनी त्यांच्या उपस्थितीत माळा घालून संन्यास घेतला आहे. तर काहींनी संन्यास घेतलेल्या लोकांकडून माळ घालून संन्यास घेतला आहे. ओशो हे विदेशातून भारतात परत आल्यावर त्यांनी 1989 मध्ये नव संन्यास अकादमी सुरू केली. या माध्यमातून मा झरीन आणि मा आविरभाव यांनी संन्यास देण्याचे काम सुरू केले आहे. एकूणच ओशो भक्त आणि माळ यांचे महत्त्व आहे.
आश्रमात जाण्यास नकार : आचार्य रजनीश ओशो यांच्या 70 व्या संबोधी दिवसानिमित्त आश्रमातील ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक पुण्यात दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ओशो भक्त आणि ओशो प्रशासन यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. भक्तांना माळा घालून आश्रमाच्या आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. पण मंगळवारी मोठ्या प्रमाणावर भक्त पुण्यात आले होते. भक्तांनी माळा घातली असताना देखील त्यांना सोडण्यात आले होते. परंतु बुधवारी या भक्तांना माळा घालून आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. तसेच त्यावेळी पोलीसांना बोलवून भक्तांना बाहेर काढण्यात आले होते. भक्तांकडून आश्रमाच्या बाहेर , भजन, गाणी, कीर्तन करून आंदोलन करण्यात आले होते.