ETV Bharat / state

तुमचे बाप कोण? हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे, अमोल मिटकरींचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर - राष्ट्रवादी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. 2019 च्या निवडणुकीमध्ये 105 आमदारांना घरी बसवून, सत्ता स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अशी टीका मिटकरी यांनी केलीये.

Amol Mitkari
अमोल मिटकरींचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
author img

By

Published : Oct 13, 2020, 10:56 AM IST

पुणे - राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. 2019 च्या निवडणुकीमध्ये 105 आमदारांना घरी बसवून, सत्ता स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अशी टीका मिटकरी यांनी केलीये.

  • काय तर म्हणे, आम्ही तुमचे बाप आहोत. 2019 वि.स. निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून मविआ सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
    2022 झाली पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहोत हे सिद्ध करून दाखवेल.

    — आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न जर अजित पवार यांना पडत असतील तर उर्जा वाया घालवू नका, आम्ही तुमचे बाप आहोत. अशी टीका अजित पवारांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

मिटकरी यांनी ट्विट करत पाटलांवर निशाना साधलाय. "काय तर म्हणे आम्ही तुमचे बाप आहोत 2019 विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 साली जनता पुणे मनपात अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल" असं ट्विट मिटकरी यांनी केलंय. दरम्यान मिटकरी यांच्या या टिकेमुळे पुन्हा एका भाजप- राष्ट्रवादीमध्ये आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.