पुणे : पुण्यातील ओशो आश्रम हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. हा आश्रम 28 एकरमध्ये आहे. हा आश्रम 21 मार्च 1976 साली सुरू झाला. कारण 1953 साली याच दिवशी ओशो हे संबोधीला प्राप्त झाले होते. सुरवातीला हा आश्रम म्हणजे इथे आचार्य रजनीश ओशो राहत होते. सर्वप्रथम ते 1974 साली या ठिकाणी आले होते. तेव्हा या आश्रमाच नाव हे रजनीश आश्रम होते. तेव्हा याला रजनीश फाऊंडेशन चालवत होते. सातत्याने ओशो हे याच आश्रमात राहत होते. ते 1981 साली ते काही काळासाठी अमेरिकेत गेले, परत ते पुण्यात आले. या आश्रमातच ओशोंनी आपले प्राण सोडले. इथेच ओशोंची समाधी आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भक्त या ठिकाणी येतात.
वादाला सुरवात : 1985 पर्यंत ओशो हे अमेरिकेला राहिले. नोव्हेंबर 1985 साली ते परत भारतात आले. त्यांनतर ते मनाली नेपाल आणि 21 देशांची यात्रा करत ते पुन्हा याच ठिकाणी परत आले. 19 जानेवारी 1990 साली त्यांनी प्राण सोडले. हा ओशो इंटरनॅशनल आश्रम आहे. त्यानंतर देखील पाच ते सहा वर्ष सर्व काही या आश्रमात सुरळीत होते. त्यानंतर इथे नेमण्यात आलेल्या ट्रस्टींनी हेच नाव वापरून झूरिक इथे सुरू केले. तेथून वादाला सुरवात झाली.
झूरिक याच ठिकाणी हेडक्वार्टर : यात 4 विदेशी आणि एक भारतीय व्यक्तीला ट्रस्टी म्हणून घेतले. त्यांनीच ठरवले की, आत्तापासून झूरिक याच ठिकाणी हेडक्वार्टर असणार आहे. तसेच ओशो यांची 60 ते 70 भाषांमधे पुस्तके आहे. 650 टायटल आहे. या सर्वांचे कॉपीराईट झुरिक फाऊंडेशनने आपल्याकडे घेतले. तेव्हापासून मुख्य वादाला सुरवात झाली. मी तिथे तेव्हा स्पोकपर्सन होतो. तेव्हा मी या सर्व गोष्टींचा विरोध केला, की पुण्यात मुख्य आश्रम आहे. पुण्यात तसेच भारताला काहीही मिळत नाही. सगळे काही विदेशात जात आहे. हे वर्ष 1997 पासून सर्व काही सुरू झाले. यानंतर ते पुन्हा एकदा आश्रमाची जागा विकायला लागले. आम्ही त्यांना विरोध केला. न्यायालयात धाव घेतली. तेव्हा न्यायालयाने यावर स्थगिती आणली, असे यावेळी न्यायालयीन लढाई लढणारे स्वामी चैतन्य कीर्ती यांनी सांगितले आहे.
आश्रमाला रिसॉर्ट करण्याचे काम : ते पुढे म्हणाले, हा वाद इथेच थांबला नाही, तर या ट्रस्टींकडून सांगण्यात येत आहे की, या आश्रमात ओशो यांची समाधी नाही. तसेच या आश्रमाला रिसॉर्ट करण्याचे काम या ट्रस्टींकडून सुरू आहे. सहा एकरवरून आज आश्रमाची जागा 28 एकरमध्ये झाली आहे. ती विकण्यासाठी प्रयत्न या ट्रस्टीकडून केला जात आहे. तसेच या ट्रस्टीकडून आत्ता तर वेगळाच नियम बनविण्यात आला आहे की, भक्तांना जी ओशो मी माळा दिली आहे, ती माळा घालून आश्रमात प्रवेश करता येणार नाही. या वादामुळे सध्या ओशो आश्रम चर्चेत आला आहे.
आश्रमाच्या बाहेर आंदोलन : पुण्यातील अल्पबचत भवन येथे आचार्य रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी संगीत ध्यानसाधना करत ७० वा ओशो संबोधी दिन साजरा करण्यात आला. जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य या कार्यक्रमात दाखल झाले होते. त्यांनतर माळा घातलेल्या भक्तांना आश्रमात सोडण्यात आले, पण दुसऱ्या दिवशी यात भक्तांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आले असल्याचे या भक्तांकडून सांगण्यात आले आहे. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना गळ्यात ओशोंची माला घालून आश्रमात प्रवेश नाकारला. तसेच ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरमध्ये ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपौर्णिमा, ओशो संबोधी दिवस असे कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे केले जात नाहीत. त्यामुळे ओशोंच्या शिष्यांनी आश्रमाच्या बाहेर आंदोलन देखील केले.
माळांमुळे एक विशिष्ट ओळख : यावर ओशो आश्रमच्या ट्रस्टी अमृत साधना म्हणाल्या की, हे जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहे, ते सर्व मुद्दे जुने आहेत. पुन्हा पुन्हा तेच मुद्दे उपस्थित केले जात आहे .माळा घालून जी प्रवेश बंदी आहे, तर ओशो स्वतः 1987 साली म्हणाले होते की माळा नाही घातली तरी चालते. कारण माळांमुळे तुम्ही एक विशिष्ट ओळखीमध्ये बांधले जाऊ शकता, त्यामुळे आम्ही त्याला बंदी केली आहे. हाच मुद्दा आता विवादित होत आहे. ओशोंचे म्हणणे खरे ठरत आहे, असे स्वामी अमृत साधना म्हणाल्या.
हेही वाचा : Osho Devotees Protest In Pune : ओशो भक्तांना आश्रमात प्रवेशबंदी; भक्तांनी पुकारले आंदोलन