ETV Bharat / state

'कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पुणे विभागात सर्वतोपरी प्रयत्न, नागरिंकाकडून सहकार्याची अपेक्षा' - कोरोना अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या 21 दिवसात आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करू शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील. प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

pune divisional commissioner  corona update pune  corona update  corona maharshtra  कोरोना महाराष्ट्र  कोरोना अपडेट  पुणे विभागीय आयुक्त
'कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पुणे विभागात सर्वतोपरी प्रयत्न, नागरिकाकडून सहकार्याची अपेक्षा'
author img

By

Published : Mar 26, 2020, 12:09 PM IST

Updated : Mar 26, 2020, 2:35 PM IST

पुणे - जिल्‍ह्यात पहिल्यांदा आढळलेल्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी जे रुग्ण दाखल झाले होते, त्यांची पहिली चाचणी निगेटिव्ही आली आहे. गुरुवारी त्यांची दुसरी चाचणी घेण्यात येईल. ती निगेटिव्ह आल्यास त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत कोरोनावर मात करू, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

'कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पुणे विभागात सर्वतोपरी प्रयत्न, नागरिकाकडून सहकार्याची अपेक्षा'

पुणे विभागात एकूण 825 नमुने घेतले होते. त्‍यापैकी 737 चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये 692 अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, तर 37 अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ 90 टक्‍के अहवाल निगेटिव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे, असे म्हैसेकर म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या 21 दिवसात आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करू शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील. प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन रुग्ण बरे व्‍हावे यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे. या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करून निघून जात असतील, तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्‍हैसेकर यांनी दिला. या संकटाच्यावेळी कुठेही डगमगून जावू नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करुया, असे आवाहन करुन स्‍वत:ला सुरक्षित ठेवा, त्‍याचबरोबर सगळयांना सुरक्षित ठेवा, असेही ते म्‍हणाले.

Last Updated : Mar 26, 2020, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.