ETV Bharat / state

मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर आमची तयारी पूर्ण - चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणाले याला महत्त्व नाही. तर घराघरात सध्या लोक घडणाऱ्या घटना पाहत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे माहीत आहे की जे झालं ते शिवसेनेमुळे झाले आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची एवढी आस लागली की त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रचे, हिंदुत्ववादाचे नुकसान झाले तरी चालेल. त्यामुळे संजय राऊत यांनी सांगावे की युती तुटण्यात कोणाचा हात होता.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Oct 2, 2021, 3:52 PM IST

Updated : Oct 2, 2021, 6:17 PM IST

पुणे - महाराष्ट्रात एकूण तीन शक्यता असून पहिली शक्यता ही सरकार कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे बदलणार आहे. यावर आशा न लावता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम सुरू केले आहे. विदर्भात प्रचंड पूर आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नाहीत. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडले. एक प्रभावी, प्रखर, मजबूत विरोधीपक्ष म्हणून काम करणे हा एक पर्याय आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात असे दिसत आहे की, हे आपापसात भांडत असेल तर 5 वर्षांपर्यंत हे घेऊन जाणार का? म्हणून सरकार बदलेल का माहीत नाही. मात्र, याच्यापेक्षा जास्त हे एकत्र काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर त्यादृष्टीने भारतीय जनता पक्ष तयारी करत आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला भाजपतर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूड येथे लोकसहभागातून स्वच्छतागृहांची सफाई आणि नुतनीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हा डहाणूकर कॉलनी येथील बुद्ध विहार तसेच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई केली. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जे झालं ते शिवसेनेमुळेच झालं -

शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणाले याला महत्त्व नाही. तर घराघरात सध्या लोक घडणाऱ्या घटना पाहत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे माहीत आहे की जे झालं ते शिवसेनेमुळे झाले आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची एवढी आस लागली की त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रचे, हिंदुत्ववादाचे नुकसान झाले तरी चालेल. त्यामुळे संजय राऊत यांनी सांगावे की युती तुटण्यात कोणाचा हात होता. भाजप म्हटले होते की मुख्यमंत्रीपद देऊ पण ते दिले नाही तर तुम्ही विरोधी पक्षात जायची तयारी दाखवायला हवी होती. मात्र, ज्यांना तुम्ही वर्षानुवर्षे शिव्या दिल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. राऊत काहीही म्हणत असले पण लोकांना माहीत आहे की, एकत्र निवडणूक लढवून मोदींच्या चेहऱ्यावर मते मागून प्रत्यक्ष सरकार बनवताना शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा - एखादा शूटर लावा अन् मारून टाका, लेव्हल सोडून बोलू नका अन्यथा...; राष्ट्रवादी-शिवसेना नेते भिडले

अनिल देशमुखांचे सर्व चान्स संपले -

न्यायालयात न्याय देताना असे सांगितलं जाते की चार दोषी सुटले तरी चालेल पण एक निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. कुठल्याही माणसाला खूप संधी द्यावी लागते. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खूप चान्स देण्यात आले आहेत. त्यांना दिलेल्या सर्व चान्स ते घेत आहेत. मात्र, त्यांना दिलेले सर्व चान्स संपले आहे. आता त्यांना शरण पत्करावे लागणार आहे. ईडी त्याबाबत ठरवणार आहे, असेदेखील पाटील यावेळी म्हणाले.

ते एकत्र लढणार आणि मरणार -

विधानसभा आणि महापालिका पूर्णपणे एकत्र ताब्यात घेण्याची आमची तयारी असताना गेल्या 6 महिन्यांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वेगळे लढण्याची भाषा करत आहेत. मात्र, यानंतर वेगळे लढण्याबाबत त्यांच्या लक्षात आले आहे की, वेगळं लढले जिंकून येणार नाही. म्हणून ते आता एकत्र लढण्याची भाषा करत आहे. हे एकत्रच लढणार आहे आणि मरणार आहे. आम्ही आमची तयारी केली आहे. तसेच मनसेबाबत सहजासहजी निर्णय होईल, असे मला वाटत नाही. कारण या युतीचे देशाच्या अन्य राज्यांमध्ये काय काय परिणाम होतील का, हे पहावं लागणार आहे. हा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात येणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Last Updated : Oct 2, 2021, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.