पुणे - राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही प्रकारचे दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. दोन ते तीन तासच फक्त दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने ग्राहकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पुण्यातील महात्मा फुले मंडईत असलेल्या सिझनल फळाला ग्राहकच मिळत नसल्याने तब्बल साडेचार टनहुन अधिक कलिंगड खराब झाले. यामुळे विक्रेत्यावर ते कलिंगड फेकून देण्याची वेळ आली.
कडक निर्बंधांचा बसला मोठा फटका -
राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहे. दिवसभरात फक्त 2 ते 4 तासच दुकाने सुरू असल्याने फळ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणत आर्थिक फटका बसला आहे. जवळजवळ 90 टक्के ग्राहक कमी झाले असून याचा फटका आम्हाला बसत आहे. यामुळे असलेला माल खराब होत असून दररोज मोठ्या प्रमाणात कलिंगड खराब होत आहे. ते फेकून द्यावे लागते आहे. याचा मोठा फटका आम्हा व्यापाऱ्यांना बसत आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी राहुल कासोरडे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - रामदेव बाबा यांच्या विधानाविरोधात आयएमएकडून थेट मोदींना पत्र
ग्राहकच नाही तर विकायचं कसे?
सरकारने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजीमंडई सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ग्राहकच येत नसल्याने माल विकायचे कसा असा प्रश्न येथील व्यापारी करत आहे. आम्ही तर एक वर एक कलिंगड फ्री देत आहोत तरी ग्राहक येत नाही आहेत. राज्य सरकारने यावर काही तरी निर्णय घ्यावा. कारण फक्त 2 ते 4 तास दुकाने सुरू असल्याने याचा मोठा फटका बसत आहे. सिझन होत म्हणून 10 टन कलिंगड आणले होते. मात्र, जेवढे विकल गेले नाही तेवढे खराब होऊन फेकून देण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा - बुलडाण्यात ओशाळली माणुसकी! बिलाच्या पैशांसाठी रुग्णालयाने ठेऊन घेतले मंगळसूत्र!