ETV Bharat / state

मावळमधील कासारसाई धरण शंभर टक्के भरले; 1 हजार 200 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

गेल्या काही दिवसांपासून मावळमध्ये पावसाचे पुनरागमन झाले असून जोरदार सरी बरसत आहेत. मावळमधील पवना धरण देखील 58 टक्के भरले असून गेल्या 24 तासांत 39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे मावळ परिसरातील भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

water release from kasarsai dam maval pune
मावळमधील कासारसाई धरण शंभर टक्के भरले
author img

By

Published : Aug 14, 2020, 12:38 PM IST

पुणे - गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारसाई धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या तिन्ही दरवाजातून सकाळी 1 हजार 200 क्यूसेकने पाण्याच्या विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात 590 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या धरणात 17.15 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

गेल्या काही दिवसांपासून मावळमध्ये पावसाचे पुनरागमन झाले असून जोरदार सरी बरसत आहेत. मावळमधील पवना धरण देखील 58 टक्के भरले असून गेल्या 24 तासांत 39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे मावळ परिसरातील भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. अगोदर, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र, पावसाने पुनरागमन करत शेतकऱ्यांना सुखावले असून पाऊस चांगला कोसळत आहे. मावळ परिसरात जून पासून आजतागायत 951 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मावळमधील कासारसाई धरण शंभर टक्के भरले
दरम्यान, मावळमधील कासारसाई धरण शंभर टक्के भरले असून तीन दरवाजे उघडत 1 हजार 200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मावळमध्ये यावर्षी उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, कासारसाई धरण शंभर टक्के भरल्याने कासारसाई, कुसगाव, पाचाने, चांदखेड, दारुंब्रे, नेरे, सांगवडे आदी गावातील शेती व पाणीपुरवठा योजनेला वरदान ठरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.