पुणे - कर्नाटक किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने कोकणासह गोवामध्ये पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर मध्य महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ.अनुपम कश्यप यांनी वर्तविला आहे.
घाट परिसरात जोरदार पाऊसाची शक्यता -
पुढील चार दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकण गोवा भागात मुसळधार पावसाची शक्यता -
कर्नाटक किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने कोकण आणि गोवामध्ये 25 जुलै ते 29 जुलै पर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.तसेच मराठवाडा आणि विदर्भात पूढील काही दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊसाची शक्यता आहे.अशी माहितीही यावेळी डॉ.कश्यप यांनी दिली आहे.