पुणे Wanwadi Murder : पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडलीय. काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर ही हत्या करण्यात आली आहे. महादेव रघुनाथ मोरे, (वय 25, रा. काळेपडळ) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, या खुनाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय.
पाच जण जाब्यात : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. तसेच मयताच्या घराजवळ राहणारी तीन मुले, हडपसर परिसरातील दोन मुलांसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. जुन्या वादातून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पटारे यांनी दिली.
क्षुल्लक कारणावरून हत्या : पुण्यात सध्या गुन्ह्यांच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होता आहे. काही दिवसापूर्वीच कोयता गॅंगनं पुण्यात दहशत माजवली होती. त्यामुळं पुण्यातील वाढती गुन्हेगारी पहायता पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचं दिसत आहे. अशीच घटना पुन्हा वानवडीत घडल्यामुळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. क्षुल्लक कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचा प्रकार आज उघडकील आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळं पुण्याच्या पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालयं.
पुण्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख : काही दिवसांपूर्वी पुण्यात दहा ते बारा जणांनी एका तरुणाची चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना पुणे येथील मंगला टॉकीज परिसरात १५ ऑगस्ट रोजी पहाटे एकच्या सुमारास घडली. चित्रपट पाहून बाहेर येत असताना एका तरुणावर चाकूनं वार करण्यात आला होता. नितीन मस्के असं खून झालेल्या तरुणाचं नाव होतं. त्याच्यावर चाकूनं वार करण्यात आले होते. त्यामुळं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या हत्या प्रकणात 12 जणाचा समावेश होता.
हेही वाचा -
Baramati Crime News : सुपारी देऊन पोटच्या मुलाचा केला खून; वयोवृद्ध मजूर दाम्पत्यासह पाच जणांना अटक