ETV Bharat / state

शरद पवारांचे वक्तव्य हे हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करणारे - विश्व हिंदू परिषद - महामंत्री मिलिंद परांडे न्यूज

शरद पवार यांनी लखनऊ येथे मंदिर आणि मशीद यांच्या ट्रस्ट संदर्भात वक्तव्य केले होते. राम मंदिरासाठी ट्रस्ट निर्माण होऊ शकते तर मशिदींसाठी का नाही? असे पवार म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य दिशाभूल करणारे असून, यामुळे समाजात अशांती पसरेल, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी केला.

parande-pawar
मिलिंद परांडे-शरद पवार
author img

By

Published : Feb 21, 2020, 5:34 PM IST

पिंपरी-चिंचवड: माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी लखनऊमध्ये केलेले वक्तव्य हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवारांचे वक्तव्य हे हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करणारे

शरद पवार यांनी लखनऊ येथे मंदिर आणि मशीद यांच्या ट्रस्ट संदर्भात वक्तव्य केले होते. राम मंदिरासाठी ट्रस्ट निर्माण होऊ शकते तर मशिदींसाठी का नाही? असे पवार म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य दिशाभूल करणारे असून, यामुळे समाजात अशांती पसरेल, असे परांडे म्हणाले.

हेही वाचा - भारताचा इतिहास पाहून वारिस पठाणांनी तोंड बंद ठेवावं - विश्व हिंदू परिषद

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवण्याचा आदेश दिलेला आहे. मशिदींसाठी ट्रस्ट बनवली पाहिजे, असा कुठलाही निर्णय न्यायालयाने दिलेला नाही. त्यामुळे नसलेले विषय उकरून काढणे पवारांसारख्या जबाबदार नेत्याला शोभत नाही. हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू या वक्तव्यामागे दिसत आहे, अशी टीका परांडे यांनी पवारांवर केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.