ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटरच्या जेवणात अळ्या, व्हिडिओ व्हायरल - पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट बामती

आकुर्डी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या जेवणाच्या ताटात जीवंत अळी निघाल्याचा प्रकार आज समोर आला. या प्रकरणी संबंधित कोरोनाबाधित रुग्णाने जेवण पुरवणाऱ्या व्यक्तींना याविषयी माहिती दिली पण त्यांनी दखल घेतली नसल्याचे त्याने माहिती दिली आहे. या दोन्ही गंभीर प्रकरणामुळे महानगर पालिकेचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.

viral video of larvae at covid center meal in pimpri-chinchwad
पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटरच्या जेवणात अळ्या
author img

By

Published : Jul 25, 2020, 8:21 AM IST

Updated : Jul 25, 2020, 1:03 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. जेवणात अळ्या, किडे निघत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून हा प्रकार चिंचवडमधील ईएसआय रुग्णालयात घडला. हे प्रकरण महानगर पालिका श्रावण हर्डीकर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटरच्या जेवणात अळ्या, व्हिडिओ व्हायरल
आकुर्डी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या जेवणाच्या ताटात जीवंत अळी निघाल्याचा प्रकार आज समोर आला. या प्रकरणी संबंधित कोरोनाबाधित रुग्णाने जेवण पुरवणाऱ्या व्यक्तींना याविषयी माहिती दिली पण त्यांनी दखल घेतली नसल्याचे त्याने माहिती दिली आहे. या दोन्ही गंभीर प्रकरणामुळे महानगर पालिकेचा भोंगळ कारभार पुढे आला असून जेवण पुरवणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये मोहननगर येथे शासकीय ईएसआय रुग्णालय आहे. त्याठिकाणी 100 बेडचे कोविड सेंटर बनवण्यात आले असून बाधित रुग्णांवर महानगर पालिकेमार्फत उपचार केले जात आहेत. परंतु, काही दिवसांपासून संबंधित रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना महानगर पालिकेमार्फत जेवण पुरवले जात असून निकृष्ट दर्जाचे असल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. हा व्हिडिओ रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने चित्रित केला आहे. जेवणात अळ्या, माशा निघत असून अनेक रुग्णांनी हे जेवण खाल्लं नसल्याचं तक्रारदाराचे म्हणणे असून अनेकांनी जेवणावर बहिष्कार टाकला होता. या निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे अतिसार, जुलाब यासारखे आजार होत असल्याची देखील सांगण्यात येत आहे. दुसऱ्या अश्याच एका घटनेत आज कोरोनाबाधित रुग्णांच्या जेवणाच्या ताटात जीवंत अळी निघाली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत असून आकुर्डी येथील कोविड सेंटर येथील प्रकार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Last Updated : Jul 25, 2020, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.