पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर ( Veteran Actor Vikram Gokhale ) असून लाइफ सपोर्टवर आहेत. त्यांचे निधन झालेले नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा, असे विक्रम गोखले यांच्या मुलीने (Vikram Gokhale daughter on fathers health ) म्हटले आहे. गेल्या 24 तासांपासून विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते उपचारांना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देत नाहीत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याचे विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी माहिती दिली.
राज्य सरकारच्या महा इन्फो सेंटर या ट्विटर ( Maha info center on Vikram Gokhale ) अकाउंटवरून विक्रम गोखले यांच्या मृत्यूपूर्वीच श्रद्धांजली वाहण्यात आली. हे ट्विट मध्यरात्री करण्यात आले. दुसरीकडे पहाटे दोन वाजता वृत्तसंस्थेने गोखले यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्या मुलीच्या हवाल्याने म्हटले आहे. माहितीची पडताळणी न करता राज्य सरकारच्या अधिकृत अकाउंटवरून श्रद्धांजली वाहून ट्विट केल्याने अनेकांनी टीका केली आहे.
15 दिवसांपासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली - गेल्या 15 दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती खालावत असल्याचेही सांगण्यात आले. गेल्या 15 दिवसांपासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ( Veteran actor Vikram Gokhale ) यांची प्रकृती ही चिंताजनक ( Vikram Gokhale condition is critical) असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ( Dinanath Mangeshkar Hospital ) येथे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून गोखले यांची तब्यत बिघडली होती.
अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन - अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्या महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा केला होता. गोखले यांनी नाट्य, दूरचित्रवाणी, चित्रपट आदी क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन, दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला आघात हा चित्रपट समीक्षकांचा चांगलाच आवडला होता. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या माऊली या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.