ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरातील आठवडी बाजार, फळे विक्री करण्यास प्रतिबंध; आयुक्त हर्डीकरांचे आदेश - pipmari chinchwad corona update

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, येथील भाजीपाला आणि फळे विक्रीस पूर्णत: प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.

vegetable market closed
पिंपरी-चिंचवड शहरातील आठवडी बाजार, फळे विक्री करण्यास प्रतिबंध; आयुक्त हर्डीकरांचे आदेश
author img

By

Published : Apr 10, 2020, 11:44 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, येथील भाजीपाला आणि फळे विक्रीस पूर्णत: प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला असून, त्याची अंमलबजावणी शनिवार दिनांक ११ एप्रिलपासून सायंकाळी ६ वाजल्यापासून मंगळवार दिनांक १४ एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक/प्रादुर्भाव आढळल्यास आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार खालील ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे.

१)भोसरी भाजीमंडई २) चिखली भाजीमंडई ३) चिंचवड भाजीमंडई ४)आकुर्डी भाजीमंडई ५) पिंपरी भाजीमंडई ६) थेरगाव भाजीमंडई ७)वाकड भाजीमंडई ८)सर्व आठवडे बाजार ९)पिंपरी चिंचवड शहरातील हातगाड्या १०)कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी ११) किरकोळ भाजीपाला व फळेविक्री ११ एप्रिल रोजी सायंकाळ ६ वाजतापासून मंगळवार दि १४ एप्रिल रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

त्यानुसार या संबंधित परिसरातील पोलीस स्टेशन प्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील व संपूर्ण शहरात कोणतीही भाजीमंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घेतील असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.