ETV Bharat / state

आम्हाला दहा टक्के आरक्षण द्या, वंजारी समाजाची मगाणी - पुणे जिल्हा बातमी

वंजारी समाजाला केवळ 2 टक्के आरक्षण आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता 10 टक्के आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सकल वंजारी समाज समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

वंजारी समाज बांधव
वंजारी समाज बांधव
author img

By

Published : Dec 7, 2020, 3:43 PM IST

पुणे - राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय पेटला असताना आता वंजारी समाजाने देखील आपल्याला 2 टक्क्यांवरून 10 टक्के आरक्षण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सकल वंजारी समाज समन्वय समिती तयार करण्यात आली असून या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आले आहे.

बोलताना फुलचंद कराड

गोपीनाथ गडावर आरक्षण मेळावा घेणार

राज्यात वंजारी समाजाची लोकसंख्या दीड ते दोन कोटी असून 2 टक्के आरक्षणाने समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षासाठी मुलांना अनेक अडचणी येत आहेत. येत्या काळात भगवान गडावर आरक्षण मेळावा घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल वंजारी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक फुलचंद कराड यांनी दिली.

गोपीनाथ मुंडे महामंडळ कार्यान्वित करण्यात यावा

ऊसतोड कामगारांचा महामंडळ असून तो गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर आहे. या सरकारने ते महामंडळ अजूनही कार्यान्वित केलेले नाही. लवकरात लवकर ते महामंडळ कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गोपीनाथ मुंडे यांचा स्मारक लवकरात लवकर करण्यात याव

औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडे यांचा स्मारक अजूनही झालेला नाही. हा स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे, अशी मागणी ही सकल वंजारी समाज समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा - तारादुतांचे 'सारथी' कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन

हेही वाचा - निरा-बारामती राज्य मार्गावर अतिक्रमणांचा विळखा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.