ETV Bharat / state

बारामतीत लाळ्या खुरकूत नियंत्रण लसीकरण अंतिम टप्प्यात - Barmati Latest News

बारामती तालुक्यात पशूसंवर्धन विभागाच्या वतीने १ लाख ४ हजार जनावरांपैकी ८६ हजार ५०० जनावरांना लाळ्या खुरकूताची लस देण्यात आली आहे. लसीकरणामुळे तालुक्यात लाळ्या खुरकूत रोग नियंत्रणात आला आहे.

Saliva scabies vaccine
लाळ्या खुरकूत नियंत्रण लसीकरण अंतिम टप्प्यात
author img

By

Published : Dec 12, 2020, 9:23 PM IST

बारामती- हिवाळ्यामध्ये लाळ्या खुरकूत रोगामुळे पशूपालक चिंतेत असतात. दुधाळ जनावरांना हा रोग झाल्यास दूध उत्पादन क्षमता घटल्याने, शेतक-याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. बारामती तालुक्यात पशूसंवर्धन विभागाच्या वतीने १ लाख ४ हजार जनावरांपैकी ८६ हजार ५०० जनावरांना लाळ्या खुरकूताची लस देण्यात आली आहे. लसीकरणामुळे तालुक्यात लाळ्या खुरकूत रोग नियंत्रणात आला आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लाळ्या खुरकूत या आजाराची सुरवात होते. हा आजार जून महिन्यापर्यंत दिसून येतो. या रोगाचा संक्रमण काळ २ ते १२ दिवसांचा आहे. आजारी जनावरास ताप येतो व तसेच तोंडामध्ये आणि कासेवर फोडे येतात. या फोडांमुळे जनावर तोंडातून सारखी लाळ गाळते. कालांतराने हे फोड फुटल्यानंतर तेथे जखमा तयार होतात. यामुळे जनावरांना चारा खाता येत नाही. त्यामुळे ते अशक्त होतात. खुरांवरही अशाच प्रकारचे फोड आल्याने जनावर चालताना लंगडले. नवजात वासरांना याची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण अधिक असते.

प्रतिबंधात्मक उपाय
१) वर्षातून दोन वेळेस जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लस टोचून घ्यावी
२) आजारी जनावरांना त्वरित वेगळ्या ठिकाणी बांधून त्यांचा इतर जनावरांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी
३) ऊसतोड करणाऱ्यांची जनावरे बऱ्याच ठिकाणी फिरल्यामुळे अशा जनावरांना रोगाचा धोका सर्वाधिक असतो

४) नवजात वासरांना लाळ्या खुरकूतग्रस्त मातेपासून दूर ठेवावे व दूध पिण्यास प्रतिबंध करावा

जनावरांना लसीकरण करून घ्यावे

बारामती तालुक्यामध्ये लाळ्या खुरकूत लसीकरणासोबतच लंपी स्किन प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. सध्या बारामती तालुक्यात लाळ्या खुरकुताचे लसीकरण अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही लसीकरणामध्ये २१ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. २१ दिवसांनतर राहिलेल्या जनावरांना लंपी स्किन तर, लंपी स्किनची लस दिलेल्या जनावरांना लाळ्या खुरकूतची लस देण्यात येणार आहे. शेतक-यांनी या दोन्ही रोगांचे गांभीर्य ओळखून आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहान तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॉ. आर. आर. पाटील यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.