पुणे - आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या वैदवाडी येथील शेतकरी दत्तात्रय पिंगळे यांच्या घराजवळ असणाऱ्या कांद्याच्या वखारीला अज्ञातांनी आग लावली. या आगीत संपूर्ण वखार जळून खाक झाली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आधीच करोना महामारीमुळे राज्यातील सर्व बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यालाही चांगला भाव नाही. भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने शेतकरी दत्तात्रय पिंगळे यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला होता. परंतु अज्ञातांनी त्या वखारीला आग लावली. यात पिंगळे यांची वखार जळून खाक झाली. यामुळे दत्तात्रय पिंगळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
हेही वाचा - प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा
हेही वाचा - पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपाकडून उद्या राज्यभर निदर्शने