पुणे - आळंदीत मॉर्निंग वॉकच्या रोडवर अज्ञातांनी दारुच्या बाटल्या फोडल्याची घटना घडली. आळंदी ते दिघीदरम्यानच्या रोडवर ही घटना घडली. त्यानंतर आळंदीतील काही नागरिकांनी सकाळी याठिकाणी साफसफाई केली. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन कडक करण्यात आल्याने दिवसभर नागरिक घरात बसत आहेत. मात्र, काही समाजकंटक आज रस्त्यांवर येऊन विद्रुपीकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आळंदी परिसरातील नागरिक पहाटेच्या सुमारास दिघी रोडवरील डोंगरावर नियमितपणे महिला व पुरुष वाॅकिंगसाठी जात असतात. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण झाले आहे. अशात काही समाजकंटकांकडून याच रस्त्यावर दारुच्या बाटल्या फोटल्याने मोठी दुखापत होण्याची भिती होती. त्यामुळे आज आळंदी शहरातील एम. डी. पाखरे यांच्यासह 10 जणांनी या रस्त्यावर झाडु मारुन साफसफाई केली.
दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी घरात बसून समूहसंसर्ग टाळण्याचा प्रयत्न नागरिक करत आहे. तर वयोवृद्ध नागरिक महिला आपल्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी डोंगरावर पायपीठ करत आहेत. असे असताना काही लोकांकडून असे गैरकृत्य झाल्याने आळंदीकरांनी संताप व्यक्त केला.