ETV Bharat / state

Ramdas Athawale on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत - मंत्री रामदास आठवले

आघाडी सरकारमधील नेते स्वतःचे प्रश्न सोडविताना दिसत असुन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याशी माझे चांगले संबंध आहे. ते या महाविकास आघाडीच्या चक्रव्युहात अडकले आहेत. उद्धव ठाकरे यांनी या सरकारमधुन बाहेर पडावे, अजूनही वेळ गेलेली नाही, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athawale ) यांनी केले.

Ramdas Athawale
रामदास आठवले
author img

By

Published : Mar 2, 2022, 7:47 PM IST

पुणे - राज्यातील महाविकास आघाडीकडुन विकासाची कामे होत नाही आहेत. आघाडी सरकारमधील नेते स्वतःचे प्रश्न सोडविताना दिसत असुन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याशी माझे चांगले संबंध आहे. ते या महाविकास आघाडीच्या चक्रव्युहात अडकले आहेत. उद्धव ठाकरे यांनी या सरकारमधुन बाहेर पडावे, अजूनही वेळ गेलेली नाही, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athawale ) यांनी केले. पुणे शहराच्या दौऱ्यावर विविध कार्यक्रमांकरता ते मंगळवारी पुण्यात आले होते. ( Ramdas Athawale on Pune Visit ) त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडी या सरकारी संस्थाचा आधार घेत नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री रामदास आठवले माध्यमांशी बोलताना

देशातील पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकांमध्ये या पाचही राज्यात एनडीएला पुर्ण बहुमत मिळेल. उत्तरप्रदेश येथे 300 पेक्षा जास्त जागा आमच्या युतीला नक्कीच मिळेल, असा असा विश्वासही मंत्री आठवलेंनी व्यक्त केला. मोदीच्या नेतृत्त्वाखाली सर्व अनुसुचित जाती मधील लोकांसाठी पंतप्रधान मोदींनी विविध योजना आणल्या त्याचा फायदा होत आहे. पाचही राज्यात एनडीए सत्तेवर येईल. यामध्ये आरपीआयमुळे आमच्या युतीला अधिक फायदा होईल.

हेही वाचा - Ramdas Athawale on Governor's Statement : राज्यपालांनी 'त्या' वक्तव्यावरून माफी मागण्याची आवश्यकता नाही - मंत्री रामदास आठवले

पुण्यात 20-25 जागा मिळाव्या -

तर सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध परिस्थतीबाबत केंद्र सरकार गंभीरपणे काम करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा गोष्टीवर राजकारण करण्यापेक्षा सरकारला सहकार्य करावे. युक्रेनमधील देशबांधवाना परत आपल्या देशात आणले पाहिजे. यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, पुणे महानगरपालिकेमध्ये 20 ते 25 जागा भाजपने आरपीआयला द्याव्यात. आरपीआयकडून बारा-तेरा नगरसेवक निवडून येण्याची हमी आम्ही देतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच दलित पँथरचा पन्नासावा सुवर्णमहोत्सव असल्यामुळे देशभरात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात विविध पद्धतीचे कार्यक्रम आयोजन केले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.