पुणे- राज्यात सध्या उच्च शिक्षण घेतलेले अनेक तरुण बेरोजगारीच्या समस्येने चिंतित आहेत. अशातच बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार जिल्ह्याच्या रांजनगाव एमआयडीसी परिसरात घडला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेरोजगारांची ही टोळी तरुणाना नोकरीचे आमिष देऊन त्याच्याकडून भरघोस पैसा घेत होती. त्यानंतर त्यांना तुटपुंज्या पगारावर छोट्याशा वर्कशॉपमध्ये नोकरी द्यायची, त्यांची पद्धत होती. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रांजणगाव पोलीस व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या परिसरातील अंकूश मलगुंडे, साहील कोकरे, महेश काळे आणि जयश्री कांबळे या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एक चारचाकी, एक दुचाकी आणि १३ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यातील उच्च शिक्षित तरूणाईला कोणाच्या ही भूलथापांना, आमिषांना बळी पडू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा- बारामतीमध्ये ४३ लाखांची चोरी करणारी टोळी जेरबंद...