ETV Bharat / state

Udayanraje: छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला प्रोटॉकॉलच्या नावाखाली पाठिशी कसे घालता? उदयनराजे संतापले - Udayan Raje present his position against

छत्रपती शिवरायांविषयी अपमानजनक वक्तव्यावरून राज्यात वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. तसेच, राज्यातील शह-काटशहाचं राजकारण यामुळे घडामोडींना वेग आला आहे. (Chatrapati Shivaji Maharaj) दरम्यान, शिवाजी महाराजांचा सतत अपमान केला जातोय. शिवरायांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला. मात्र, आदर्श विचार देणाऱ्या राजेंचीच चित्रपट, लिखानातून सतत विटंबना होत आहे, हे वाईट आहे. तसेच, आपण यावर सतत प्रतिक्रिया देत राहायचे असही उदयनराजे म्हणाले आहेत.

Udayan Raje
Udayan Raje
author img

By

Published : Dec 3, 2022, 10:16 AM IST

Updated : Dec 3, 2022, 5:22 PM IST

पुणे: शिवाजी महाराजांचा सतत अपमान केला जातोय. शिवरायांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला. मात्र, आदर्श विचार देणाऱ्या राजांची चित्रपट, लिखानातून सतत विटंबना होत आहे, हे वाईट आहे. तसेच, आपण यावर सतत प्रतिक्रिया देत राहायचे. आता तर आपण प्रतिक्रियावादी झालो आहोत, असे उदयनराजे यांनी म्हणले आहे. ते रायगडवरून 'शिवसन्मानाचा' या कार्यक्रमात बोलत होते.

उदयनराजे संतापले

पदावरून हटवण्याची आक्रमक: छत्रपती शिवरायांचा अपमान होणारे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षांत संताप आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची आक्रमक मागणी केली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari ) भाजपचे असूनही खासदार उदयनराजे यांनी पक्षश्रेष्ठींना यावरून इशारा दिला होता. राज्यपालांविरोधात भाजपने कठोर भूमिका घेतली नाही, तर मी टोकाचा निर्णय घेऊ शकतो, असे उदयनराजे भोसले यांनी म्हणले होते.

Udayan Raje
Udayan Raje

खासदारकीचा राजीनामा देणार: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतरही कारवाई न झाल्याने उदयनराजे आज रायगडावर जाऊन भूमिका मांडणार आहेत. काल उदयनराजे किल्ले रायगडाच्या दिशेने रवाना झाले. उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार की, राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देणार की आणखी कुठली भूमिका घेणार हे महत्त्वाचे असणार आहे.

महाराजांवर टीका करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधत छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. अशातच शिंदे- भाजप सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत, आता या विषयावर पडदा पडायला पाहिजे असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा सामना अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

चुकीचा बोलायची हिंमत केली तर सगळ्या गटा-तटाचे मावळे एकत्र येणारकोणत्याही गटा-तटाचा असो, जो कोणी आपला मावळा असेल तो आपल्यासाठी एकत्र येणारच. या मावळ्यांचा जो निर्णय असेल तो शिरसावंद्य असेल. यापुढे आपल्याबद्दल एक वाक्यच नव्हे तर शब्द जरी चुकीचा बोलायची हिंमत केली तर आम्ही त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही. उठसूठ आपली कोणाशीही तुलना तुलना करणार्‍यांना इतिहासाचा धडा शिकवावाच लागणार आहे.

शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागणार: आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कोणत्याच महापुरूषाचा अवमान सहन केला जाणार नाही, असे आम्ही वचन देतो, असे उदयनराजेंनी पत्रात म्हटले आहे.शिवद्रोह्यांना कठोर शिक्षा करण्याची वेळविकृत लोकांशी कसे वागायचे हे आम्हाला माहिती आहे. परंतु, इथे काही विकृत माथी आहेत. ती कायमची वठणीवर आणायची आहेत. वारंवार आपल्याकडे बोट दाखविणार्‍यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागणार आहे. आपल्या माणसावर वार करायचा नसतो, पण शिवद्रोह होत असेल तर त्यांना कठोर शासन करण्याची वेळ आली आहे. आम्ही वचन देतो की, कोणत्याही महापुरूषाचा अवमान आता सहन केला जाणार नाही, अशा निर्वाणीच्या भाषेत उदयनराजेंनी पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पुढील आंदोलन आझाद मैदानावर: छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यामुळे आपण आज इतिहासाचा भाग झालोय. मी आता महाराष्ट्रभर फिरणार आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना भेटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व धर्म समभावाच्या विचारांना कलाटणी देऊन चित्रपट, लिखान आणि वक्तव्यातून अवमान केला जात आहे. या प्रश्नावर आंदोलनासाठी आम्हाला आझाद मैदान फार लांब नाही. लवकरच तारीख निश्चित करून आपल्याला या प्रश्नावर आझाद मैदानावर जायचे असल्याचे संकेत उदयनराजेंनी शिवप्रेनींना दिले.

राज्यभर शिवसन्मान निर्धार मोहीम काढणार: राज्यपाल कोश्यारी हे कधीच मोठे नव्हते, राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. राज्यपालांवर पांघरुन घालणार्‍यांना लाज वाटली पाहिजे, छत्रपतींच्या अवमानावर कुणी बोलायला तयार नाही. परंतु, मी राज्यभर फिरणार आहे. वेगवेगळ्या घटकांतील लोकांना भेटणार असून यापुढे शिवाजी महाराजांचा अवमान करून दाखवाच, असा इशारा उदयनराजेंनी दिला.

बचाव करणार्‍यांना लाज वाटली पाहिजे: राज्यपालांना असे म्हणायचे नव्हते, त्यांचा तसा उद्देश नव्हता, असे सांगून राज्यपालांचा बचाव आणि त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. बचाव करणार्‍या लोकांना लाज वाटली पाहीजे. शिवरायांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आम्ही मुग गिळून पाहत बसलो आहोत. शिवरायांच्या अवमानावर आम्ही केवळ प्रतिक्रिया वादी झालो असल्याची खंतही खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

Last Updated : Dec 3, 2022, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.