ETV Bharat / state

Twin sisters got same mark : पुणे आणि कोल्हापूरच्या दोन जुळ्या बहिणींना मीळाले एकसारखे गुण - got the same mark

दहावीचा निकाल नुकताच लागला. यात मुलींनी बाजी मारली. निकालातील वेगळेपण समोर येत आहे. सध्या चर्चा जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील जुळ्या बहिणींच्या निकालाची आहे. या बहिणींनी 91.40 टक्के एवढे एकसारखेच गुण आहे. कोल्हापुरातील जुळ्या बहिणींनींना पण असेच सारखे गुण मिळाल्याचे समोर आले आहे.

Twin sisters got same mark
दोन जुळ्या बहिणींना एकसारखे गुण
author img

By

Published : Jun 7, 2023, 2:51 PM IST

पुणे / कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे परिसरात असणाऱ्या गुळूंचवाडी येथे भावना आणि भक्ती गुंजाळ या जुळ्या बहिणी राहतात. नुकत्याच लागलेल्या 10 वीच्या निकालात त्यांना 91.40 टक्के एवढे एकसारखे गुण मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या या समान गुणाची चर्चा आहे. भावना आणि भक्ती हा जुळ्या बहिणींनी बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे महाविद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. या दोघींना प्राथमिक शिक्षणात देखील समान गुण पडत आले आहेत. भावना आणि भक्ती हिचे वडील पुंडलिक गुंजाळ हे ट्रकचालक असून त्यांची आई वैशाली शेतकरी तसेच गृहिणी आहेत.या दोघांचा जन्म झाल्यापासून दोघे एकत्र जेवतात, एकत्रच अभ्यास करतात. त्यांना सारखेच मार्क पडल्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय झाल्या आहेत.

तर दुसरा असाच प्रकार भाग्यदा आणि पुण्यदा या कोल्हापूर मधल्या जुळ्या बहिणीच्या बाबतीतही घडला आहे. दोघीही दिसायला सारख्या आहेत. दोघीही एकाच शाळेत शिकतात दहावीला दोघींनाही 97 टक्‍के एवढे समान गुण मिळाले आहेत. या अनोख्‍या सारखेपणाची चर्चा सध्‍या कोल्हापुरात आहे. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूलमधील पुण्यदा आणि भाग्यदा नाईक या दोघींचे वडील सुधांशू नाईक हे दक्षिण आफ्रिकेत नोकरीस आहेत. दोन्ही मुली या पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार आणि विविध कलागुणात पारंगत आहेत.

भाग्यदा आणि पुण्यदा या दोघीही कथ्थक नृत्य शिकतात, यात त्यांनी नृत्याच्या चार परीक्षाही दिल्या असून त्यांचे शिक्षण सुरु आहे. या शिवाय त्यांना गड कोट किल्ल्यांवर ट्रेकिंग करायला जाणे ही त्यांची आवड आहे. दोन्ही बहिणी घरात लाडक्या आहेत. एकाच क्लासमध्ये त्या शिकायच्या तसेच अभ्यासात एकमेकींची साथ सोबत करायच्या त्यांना एकुण ९७ टक्के येवढे समान गुण मिळाले आहेत. तर तीन विषयांमध्येही त्यांना सारखेच गुण पडले आहेत. या बद्दल सगळे आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्या शाळेत दुसऱ्या आल्या आहेत. पुण्यदाला मात्र पुढे मायक्रोबायोलॉजी मध्ये तर भाग्यदाला क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये आपले करियर करायचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.