ETV Bharat / state

पुणे विभागात आजअखेर 2 हजार 355 जण कोरोनामुक्त, 248 जणांचा झाला मृत्यू - 2355 covid-19 patients recovered in Pune division

पुणे विभागात 19 मे अखेर 2 हजार 355 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सद्यघडीला विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 996 इतकी आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 2 हजार 352 इतके आहेत. विभागात कोरोनाबाधित 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

two thousand 355 covid-19 patients recovered till date in Pune division
पुणे विभागात 19 मे अखेर 2 हजार 355 जण कोरोनामुक्त, 248 जणांचा झाला मृत्यू
author img

By

Published : May 19, 2020, 8:59 PM IST

पुणे - पुणे विभागात 19 मे अखेर 2 हजार 355 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सद्य घडीला विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 996 इतकी आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 2 हजार 352 इतके आहेत. विभागात कोरोनाबाधित 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 172 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

सोमवारच्या तुलनेत, बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 157, सोलापूर जिल्ह्यात 53, कोल्हापूर जिल्ह्यात 40, सातारा जिल्ह्यात 5, सांगली जिल्ह्यात 2 अशी वाढ झालेली आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी जिल्हानिहाय -

  • पुणे जिल्ह्यात 4 हजार 280 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 हजार 69 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 996 इतकी आहे. तर 215 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 165 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
  • सातारा जिल्ह्यात 138 रुग्ण आहे. यातील 75 जण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 61 इतकी आहे. कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • सोलापूर जिल्ह्यात 443 रुग्ण असून 165 जण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 209 इतकी आहे. कोरोनाबाधित 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • सांगली जिल्ह्यात 52 बाधित रुग्ण असून 33 जण बरे होवून घरी गेले आहेत. 18 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे.
  • कोल्हापूर जिल्ह्यात 83 बाधीत रुग्ण असून 13 जण बरे होवून घरी गेले आहेत. 2 जणांचा मृत्यू झाला असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 68 आहे.

आजघडीपर्यंत विभागामध्ये एकुण 56 हजार 430 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 46 हजार 992 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 495 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 41 हजार 916 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 4 हजार 996 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.