पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील इतर शहरांमध्ये गोवरचे रुग्ण (measles patients) हे वाढत आहे. आता पुण्यात देखील गोवरने शिरकाव केला आहे. पुण्यातील भवानी पेठेत गोवरचे दोन रुग्ण हे आढळून आले आहेत. पुण्यातील भवानी पेठेतील (Bhawani Peth Pune) लोहियानगर, कासेवाडी या भागांत दोन रुग्ण आढळून आले आहेत. गोवरसदृश आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. चाचणीनंतर त्यांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, एकाच भागातील हे रुग्ण असल्याने या भागाला गोवर उद्रेक क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहे.
तपासणी मोहीम : या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या भागात एक ते पाच या वयोगटातील १ हजार ७५१ मुले आहेत. त्यापैकी ५२९ बालकांना लस दिली गेली आहे. उर्वरित बालकांना पुढील पाच दिवसांत लस देण्याचे नियोजन महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्याची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत, गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेलासारख्या सर्व आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्यात (Two measles patients found in Bhawani Peth Pune) येते.
लसीकरण मोहिमेस सहकार्य : मुंबई आणि इतर भागात सध्या सुरु असणा-या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेने आपल्या कुटुंबातील ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवरची लस तातडीने द्यावी. शासन सुरु करत असलेल्या विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस सहकार्य (measles patients in Pune) करावे. आपल्या परिसरातील मुलांनीही ती घ्यावी, यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत. गोवर हे लहान मुलामधील प्रतिकार शक्ती कमी होणे, अतिसार, न्युमोनिया अशा गंभीर आजारांचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बालके विविध आजार आणि कुपोषणाच्या दुष्टचक्रात सापडतात, हे लक्षात घेऊन सर्वांनी लसीकरण मोहिमेस सर्वप्रकारे सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत (measles patients found in Bhawani Peth) आहे.