पुणे - अनैतिक संबंधातील वादातून एका विवाहित तरुणाची पत्नीच्या दोन प्रियकरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील खंडाळे येथे घडली. गणेश पाडेकर (रा.आळेफाटा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
फोन नंबरमुळे सापडले आरोपी -
खंडाळे गावच्या हद्दीत ११ मे'ला अमृत दरवडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये गणेशचा मृतदेह एका पोत्यात आढळून आला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमा होत्या. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला, सुरुवातील यातील गुन्हेगार शोधणे अवघड झाले होते. मात्र, गणेशच्या खिशात सापडलेल्या फोन नंबरवरुन रांजणगाव पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात अवघ्या काही तासात यश असल्याची माहिती रांजणगावचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.