पुणे - लॉकडाऊनमुळे पुणे विभागात अडकलेल्या परराज्यातील 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना आज अखेर त्यांच्या मूळ गावी पोहोचवले आहे. तसेच आतापर्यंत मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम, ओडिशा तसेच पश्चिम बंगाल या राज्यामधील नागरिकांना घेऊन पुणे विभागातून 153 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली
पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी 61, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मीरसाठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओडिशासाठी 2 व पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 153 रेल्वेगाड्या 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहे.