ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू - मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग अपघात बातमी

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख अजून पटली नसून पोलीस तपास करीत आहेत.

घटनास्थळावरील छायाचित्र
घटनास्थळावरील छायाचित्र
author img

By

Published : Jun 23, 2020, 11:59 AM IST

Updated : Jun 23, 2020, 4:01 PM IST

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (दि. 23 जून) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत व्यक्तीची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत. मृत व्यक्तींचे वय हे अंदाजे 30 ते 35 असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हे पीकअपने मुंबईच्या दिशेने जात होते. परंतु, काही अंतरावर त्यांची गाडी बंद पडली. त्यामुळे ते पुण्याच्या दिशेने उलट चालत येत होते. तेव्हा, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शिरगाव पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे मृतदेह पाठवले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवसांवर

Last Updated : Jun 23, 2020, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.