आळंदी (पुणे) - राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्यसरकार दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा संकट काळात राज्य सरकार मुख्यमंत्री फंडातील निधी खर्च करू शकतात. या खर्चाला विधानसभेत मान्यता द्यावी, यासाठी सत्ताधारी व विरोधकांच्या संमतीने दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिवेशन -
कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे. त्याचा खर्च किती असेल, या सर्व बाबींची माहितीही या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचेल. त्यामुळे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाबाबत विरोधकांकडून सुरू असलेल्या चर्चांवर, टीका टिप्पणीवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा तयारीला लागली आहे. यासाठी लागणारी आर्थिक तरतूद, विविध योजना अशा सर्व गोष्टी विधानसभेमध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चर्चा करून ठरवल्या जातील.
या तारखेला होणार अधिवेशन -
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी व कोरोनाबाबत राज्यपातळीवर विविध योजनांची आखणी करण्यासाठी बोलाविण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आळंदी येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.
हेही वाचा - पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी
हेही वाचा - विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबीज