पुणे - जिल्ह्यातील जुन्नर शहरालगतच्या सोमतवाडी येथील पद्मावती तलावाच्या ( Two childrens drowned Junnar ) ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. तलावात गाळ असल्याने त्या गाळात अडकून दोन या मुलांचा मृत्यू झाला. रविवारी उशिरा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पवन दुर्गेश ठाकूर (वय 13) ( Pawan Thakur drowned Junnar ), सम्राट देवेंद्र परदेशी (वय 14) दोघेही राहणारे परदेशपुरा जुन्नर, असे मृत शाळकरी मुलांची नावे आहेत.
दोघेही अल्पवयीन मुले सोमतवाडी येथील पद्मावती तलाव येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तलावाच्या कडेला उभे राहून फोटो काढत असताना दोघांचाही पाय घसरला व ते तलावात पडले. तलावात गाळ साचला असल्याने दोघांना त्याचा अंदाज आला नाही व दोघेही तलावात बुडून गेले. त्यातच दोघांचा मृत्यू झाला. याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी मृतदेह बाहेर काढले. यानंतर त्यांचे मृतदेह जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जुन्नर पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - डॉ. प्रकाश आमटे कर्करोगाच्या उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात