पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात महावितरणची तार तुटून दोन म्हशींचा (Two buffaloes died in Kondhwa area of Pune) मृत्यू झाला आहे. कोंढवा येथील बुर्हाणी इंडस्ट्रीजच्या रस्त्यावर असलेल्या महावितरण ची तार तुटली असून; यात दशरथ कामठे या शेतकऱ्याच्या दोन म्हशी मृत पावल्या आहेत. महावितरणच्या चुकीमुळे (negligence of Mahavitran) शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.Two buffaloes died
म्हशींना तारांचा स्पर्श : बुर्हाणी इंडस्ट्रीजच्या रस्त्यावरच महावितरणच्या तारा तुटून पडल्या होत्या. यावेळी दशरथ कामठे हे सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास आपल्या म्हशींना दरोरोजच्या प्रमाणे घेऊन जात असताना, म्हशींना विद्युत तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे म्हशी तारांना चिटकल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नुकसान भरपाई द्यावी : जेव्हा महावितरणच्या तारा पडलेल्या होत्या. तेव्हाच स्थानिक नागरिकांकडून महावितरणला सांगण्यात आल होते. पण महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे अडीच लाख रुपयांचे दोन म्हशी मृत पावल्या आहे. त्यामुळे याची नुकसान भरपाई महावितरनाने द्यावी, अशी मागणी देखील यावेळी शेतकरी दशरथ कामठे यांनी केली आहे.Two buffaloes died
आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये अश्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, त्याचा प्रशासनाने कुठलाही धडा घेतलेला नाही. या मृत म्हशींच्या जागी जर का माणसाला तारेचा स्पर्श झाला असता, तर कदाचित आज त्या शेतकऱ्याचे प्राण जायला सुध्दा वेळ लागला नसता, अश्या प्रतिक्रिया समाजातुन उमटत आहे. महावितरण प्रशासनाच्या या हलगर्जीपणाची दखल शासनाने प्रामुख्याने घ्यायलाच हवी.