पुणे - आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे मांडूळ प्रजातीच्या दुर्मिळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना मंचर पोलिसांनी शिताफीने पकडून लाखो रुपये किंमतीचे मांडूळ जातीचे साप हस्तगत केले आहे.
एका दुचाकीवर (एम एच 14 बी 5304) दोन जण मौजे भराडी गावच्या हद्दीत बस स्टॉपसमोर भराडी फाटा येथे येथे मांडूळ जातीच्या सापांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी संभाजी बाबुराव राजगुरू (रा. भराडी), सुनिल दिलीप पवार (रा. निरगुडसर) या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस ठाण्यात नेत चौकशी केली. त्यानंतर त्या मांडूळ जातीचे साप मिळून आल्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पत्र पाठवून मांडूळ ताब्यात घेऊन तक्रार देण्याबाबत कळवले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - घरभाडे-लाईट बिलचे पैसे पतीने दारूत गमावेल, पत्नीने पेटवून घेतले