ETV Bharat / state

पुणे अनलॉक: तुळशीबाग अन् महात्मा फुले भाजी मंडई आजपासून सुरू

author img

By

Published : Jun 5, 2020, 6:32 PM IST

कोरोना महामारीमुळे गेली अडीच महिने पुण्यातील जनजीवन ठप्प होते. आता कन्टेंनमेंट झोन वगळता उर्वरित भागातील दैनंदिन जीवन सुरू करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे तुळशीबाग आणि महात्मा फुले भाजी मंडई आजपासून सुरू झाली.

Tulshibagh
तुळशीबाग

पुणे - खरेदीची आवड असणाऱ्यांची लाडकी तुळशीबाग आणि महात्मा फुले भाजी मंडई आजपासून सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून येथील व्यवहार सुरू राहणार आहेत. मागील अडीच महिन्यांपासून सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे येथील व्यावसायिकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे तुळशीबाग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुण्यातील मंडई आणि तुळशीबाग आजपासून सुरू

कोरोना महामारीमुळे गेली अडीच महिने पुण्यातील जनजीवन ठप्प होते. आता कन्टेंनमेंट झोन वगळता उर्वरित भागातील दैनंदिन जीवन सुरू करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध शिथील केले आहेत. त्यानंतर स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रत्यक्षात तुळशीबाग व मंडईची पाहणी करून कसे नियोजन करता येईल याबाबत चर्चा केली. येथील स्थानिकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल, असा विश्वासही प्रशासनाने त्यांना दिला. पोलीस प्रशासनाशी देखील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तुळशीबागेतील दुकाने, पथारी व मंडईतील व्यवसायिकांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवून व्यापारी महानगरपालिकेने दिलेल्या नियमांचे पालन करूनच व्यवसाय करु, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळू, असे तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.