पुणे- कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एरवी गजबजणारी तुळशीबाग बंद ठेवण्यात आली आहे. इतर दिवशी गजबजलेली तुळशीबाग आज ओस पडली आहे.
हेही वाचा- सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांत कोरोनाची भीती; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला
तुळशीबागेत सुमारे 300 दुकाने आहेत. ही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्ल्यूची साथ आली तेव्हा तुलशीबाग अशाच पद्धतीने बंद होती. त्यानंतर आता कोरनाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबाग बंद ठेण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.